Border Security Force Jawan Payment : भारतीय सैन्यात जाऊन देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची भावना अनेकांच्या मनात असते. यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने तरुण उमेदवार सैन्य भरतीसाठी मैदानात उतरत असतात. पण, तुम्हालाही सैन्यात भरती व्हायचे आहे का ? विशेषता ज्यांना बीएसएफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये जायचे असेल त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
बीएसएफ हे भारतातील एक प्रमुख निमलष्करी दल आहे. देशाच्या बॉर्डरवर अर्थातच सीमेवर बीएसएफचे जवान तैनात असतात. हे जवान देशातील सीमांचे रक्षण करतात आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीं रोखण्याची जबाबदारी देखील याच निमलष्करी दलाकडे असते.
युद्धाच्या काळातही हे निमलष्करी दल सर्वात महत्त्वाची जबाबदारी निभावत असते. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धानंतर बीएसएफची स्थापना झाली. गृहमंत्रालयाच्या प्रशासकीय यंत्रणेखाली बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स कार्यरत असते.
यामुळे बीएसएफ मध्ये जाण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी अनेक जण तयारी देखील करतात. बीएसएफ अर्थातच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मध्ये जाण्यासाठी अनेक तरुण अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत.
भारत आणि बांगलादेशसह भारतमातेच्या सीमेचे रक्षण करण्याची अनेकांची इच्छा असते. सध्या बीएसएफ मध्ये दोन लाख 70 हजार जवान कार्यरत आहेत. या संख्येसह हे जगातील सर्वाधिक मोठे निमलष्करी दल आहे हे विशेष.
त्यामुळे जर तुम्हालाही या जगातील सर्वाधिक मोठ्या निमलष्करी दलात सामील व्हायचे असेल तर आज आपण या जवानांना सरकारकडून किती पगार मिळतो या संदर्भात थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बीएसएफ जवानांना नेमका किती पगार मिळतो ?
बीएसएफ जवानांना त्यांच्या रँकनुसार आणि सेवा कालावधीनुसार पगार मिळतो.
महासंचालक : रु. २,२५,००० प्रति महिना
विशेष महासंचालक : रु. १,०५,००० प्रति महिना
अतिरिक्त महासंचालक : रु. १,०५,००० प्रति महिना
महानिरीक्षक : रु. ९५,००० प्रति महिना.
उपमहानिरीक्षक : रु. ८५,००० प्रति महिना
कमांडंट : रु. ८२,००० प्रति महिना.
सेकंड-इन-कमांड : रु. ७३,००० प्रति महिना
डेप्युटी कमांडंट : रु. ६५,००० प्रति महिना
असिस्टंट कमांडंट : रु. ५२,००० प्रति महिना
सुभेदार मेजर : रु. ४५,००० प्रति महिना.
निरीक्षक : रु. ४०,००० प्रति महिना.
उपनिरीक्षक : रु. ३५,००० प्रति महिना
सहाय्यक उपनिरीक्षक : रु. ३१,००० प्रति महिना
हेड कॉन्स्टेबल : रु. २५,५०० – रु. ८१,१०० प्रति महिना
कॉन्स्टेबल : रु. २१,००० – रु. ६९,१०० प्रति महिना