Rich Dad Poor Dad Book : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये रीच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक खूपच चर्चेत आहेत. चर्चेचे कारण असे की या पुस्तकातून त्यांनी जगाला श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवला मात्र ते स्वतः कर्जबाजारी झाले आहेत.
विशेष म्हणजे याची माहिती त्यांनी स्वतः instagram वर दिली आहे. यामध्ये त्यांनी ते कर्जाला घाबरत नसून या कर्जाची त्यांना अजिबात चिंता नसल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी लोकांना कर्ज घेऊन रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

खरंतर या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्याकडे तब्बल 100 मिल्लियन डॉलरची संपत्ती आहे. यामुळे त्यांना त्यांच्याकडे असलेल्या कर्जाची अजिबात चिंता नाहीये. अशा परिस्थितीत, आज आपण रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात श्रीमंत होण्याचे सांगितलेले सूत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तुम्हाला ठाऊकच असेल की Rich Dad Poor Dad हे संपूर्ण जगात सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक आहे. हे जगातील एक बेस्ट सेलिंग बुक म्हणून ओळखले जाते. एका आकडेवारीनुसार जगातील दोनशे पैकी एका माणसाने तरी या पुस्तकाचे वाचन केलेले आहे.
यावरून आपल्याला या पुस्तकाची लोकप्रियता समजतेच. विशेष म्हणजे जाणकार लोक श्रीमंत व्हायचे असेल तर हे पुस्तक एकदा नक्कीच वाचले पाहिजे असे सांगतात. या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गरीब आणि श्रीमंत लोकांमधील भेद काय असतात याबाबत या पुस्तकात सविस्तर माहिती दिलेली आहे.
या पुस्तकात श्रीमंत होण्याचे मार्ग त्यांनी सांगितले आहेत. ते सांगतात की, आव्हानांपासून कधीच दूर गेले नाही पाहिजे. आव्हानांचासामना केला पाहिजे. यासोबतच त्यांनी कमाई प्रमाणेच बचत करणे देखील महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
तसेच बचत केलेल्या पैशांपासून आणखी पैसा कमावणे हा श्रीमंत होण्याचा मूल मंत्र असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पुस्तकात रिस्क घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पर्सनल फायनान्स बाबत स्वतःला एज्युकेट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
या पुस्तकात स्वतःसाठी काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण की नोकरी करून वेल्थ म्हणजेच संपत्ती तयार होत नसते, असे म्हटले गेले आहे.