BSF Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी विशेषता ज्यांना देशसेवेची इच्छा असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बॉर्डर सेक्युरिटी फोर्स अथात बीएसएफने विविध रिक्त जागांसाठी एक मेगा भरती काढली आहे.
खरंतर अनेक तरुणांचे भारतीय सैन्यात सहभागी होण्याचे स्वप्न असते. सैन्य भरतीची तयारी करणारे उमेदवार नेहमीच बीएसएफ मध्ये जाण्याचे स्वप्न पाहतात.

दरम्यान बीएसएफ मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दल अंतर्गत 549 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली असून आज आपण या नोकर भरतीची डिटेल माहिती या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की बीएसएफने अलीकडेच नव्या सैन्य भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. बीएसएफ मध्ये ही जी भरती होणार आहे ती फक्त स्पोर्ट्स कोटा अंतर्गत होईल.
ही भरती 549 पदांसाठी राहणार असून यामध्ये 277 जागा पुरुष खेळाडूंसाठी आणि 272 जागा महिला खेळाडूंसाठी राहतील. स्पोर्ट्स कोटा अंतर्गत जाहीर झालेल्या या पदभरतीमध्ये 30 पेक्षा अधिक खेळांमधील खेळाडूंना सामील होण्याची एक मोठी संधी मिळणार आहे.
पात्रता काय असणार?
स्पोर्ट्स कोटा अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या या भरतीमध्ये 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवारांना अर्ज सादर करता येईल. पण ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची अतिरिक्त सूट मिळणार आहे त्याचवेळी एस सी आणि एसटी कॅटेगिरी मधील उमेदवारांना अतिरिक्त पाच वर्षांची सूट दिली जाणार आहे. वयाची गणना ही 18 ऑगस्ट 2025 या तारखेच्या आधारावर होणार आहे.
किती पगार मिळणार?
बीएसएफ मधील या नोकर भरती अंतर्गत सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांना दर महिन्याला 21,700 ते 69,100 रुपये वेतन दिलं जाईल. याव्यतिरिक्त इतरही अनेक भत्ते आणि सोई सुविधा या कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील.
अर्जासाठी किती शुल्क भरावे लागणार ?
या पद भरतीसाठी ओबीसी आणि जनरल कॅटेगिरी मधील उमेदवारांना 159 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याचवेळी एससी आणि एसटी कॅटेगिरी मधील उमेदवारांना अर्जासाठी कोणतेच शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?
या नोकर भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबर 2025 पासून सुरु होईल अशी शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे हे अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. अर्थात अजून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही.