महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पहिले स्थानक तयार ! ‘या’ दोन स्थानकादरम्यान पहिल्यांदा धावणार बुलेट ट्रेन

भारताला लवकरच बुलेट ट्रेनची भेट मिळणार आहे. देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे.

Published on -

Bullet Train Project : महाराष्ट्र आणि गुजरात हे देशातील दोन महत्त्वाची राज्य. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. देशाच्या एकूण अर्थकारणात राजधानी मुंबईचा आणि आपल्या महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.

हेच कारण आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि गुजरात मधील अहमदाबाद या दोन शहरांना बुलेट ट्रेनने कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम आता अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे.

हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आता वास्तवात येण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. या प्रकल्पातील एक महत्त्वाचे स्थानक नुकतेच पूर्ण झाले असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बाबत नवीन अपडेट 

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या अगदीच युद्धपातळीवर सुरू आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या कामाची अपडेट दिली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, या प्रकल्पासाठी आतापर्यंत 300 किलोमीटर लांबीचा वायाडक्ट तयार करण्यात आलाये. विशेष बाब अशी की, यातील 257 किमीचा भाग ‘फुल स्पॅन लाँचिंग’ तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्रकल्पाचे काम अधिक वेगाने आणि सुरक्षिततेने पूर्ण होत आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत गुजरातच्या सूरतजवळ 40 मीटर लांबीच्या बॉक्स गर्डरचंही काम सुरू आहे.

आतापर्यंत या प्रकल्पाअंतर्गत 383 किलोमीटरमध्ये पीयर्स, 401 किमी फाउंडेशन आणि 326 किमीमध्ये गर्डर कास्टिंगचं काम पूर्ण करण्यात आल आहे.

या स्थानकाचे काम पूर्ण

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर तीन प्रमुख स्टेशन उभारण्यात येत आहेत. महत्त्वाची बाब अशी की त्यापैकी सूरतमधील स्टेशन जवळपास पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाचा गुजरात मधील जवळपास 157 किमीचा भाग पूर्ण झाला आहे. म्हणजेच लवकरच या मार्गावर बुलेट ट्रेन धावताना दिसणार आहेत. पुढील वर्षात बुलेट ट्रेनची चाचणी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वतंत्र डेपो सुद्धा उभारण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. जर या प्रकल्पाचे काम असेच युद्ध पातळीवर सुरू राहिले तर पुढील वर्षी जपानमधील शिंकान्सेन ट्रेनचे डबे भारतात दाखल होणार असे बोलले जात आहे.

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन मार्गावर ऑगस्ट 2026 मध्ये बुलेट ट्रेन धावताना दिसणार आहे. सुरत ते बिलिमोरा या मार्गावर पहिल्यांदा बुलेट ट्रेन धावणार अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe