Bullet Train : भारतीय रेल्वेचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा कायापालट झाला आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी कोणत्या भारत एक्सप्रेस सारख्या सेमी हायस्पीड ट्रेन सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे येत्या काही वर्षांनी बुलेट ट्रेन सुद्धा धावणार आहे.
दरम्यान देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत आता रेल्वेमंत्र्यांकडून महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद अशी धावणार आहे.

आता या प्रकल्पाबाबत सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार? याची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा येत्या दीड वर्षांनी सूरु होईल. जानेवारी 2027 मध्ये याचा पहिला टप्पा सुरू होणार अशी माहिती देण्यात आली आहे.
गुजरातमधील सूरत – बिलीमोरा या 50 किलोमीटरच्या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. 508 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे मुंबई – अहमदाबाद अंतर केवळ दोन तासांत पूर्ण करता येणार असा अंदाज आहे.
सध्या या मार्गावर रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुमारे नऊ तासांचा कालावधी लागतो. पण बुलेट ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. या प्रकल्पांतर्गत सूरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनचे काम पूर्ण झाले असून सध्या त्याचे फिनिशिंग सुरू आहे.
हे स्टेशन डायमंडच्या आकारात बांधले गेले असून वेटिंग लाउंज, नर्सरी, प्रसाधनगृहे, किरकोळ दुकाने यासह सर्व आधुनिक सुविधा येथे उपलब्ध राहणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी येथे लिफ्ट, एस्केलेटर, विशेष साइनबोर्ड, माहिती कियोस्क आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली बसवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2028 पर्यंत ठाणे – अहमदाबाद हा टप्पा सुरू होणार आहे.
तसेच हा संपूर्ण प्रकल्प मुंबई-अहमदाबाद मार्ग कार्यान्वित होणार आहे. भारत सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट काही भागांमध्ये एलिवेटेड, काही भागात भूमिगत व काही ठिकाणी लूप लाईनवर असेल. लूप लाईनवर ट्रेनचा वेग थोडा कमी असेल.













