Bullet Train : भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांमध्ये नेत्रदीपक प्रगती केलीये. रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस सारख्या सेमी हाय स्पीड ट्रेन दाखल झाल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान झालाय.
अशातच गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असल्याची बातमी वेगाने व्हायरल होत आहे.

पण खरंच सरकारचा असा काही प्लॅन आहे का? बुलेट ट्रेन ऐवजी खरंच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार का? याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी मोठी माहिती दिली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की वंदे भारत मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावणार नाही. ठाण्यात माध्यमांशी बोलताना मंत्रीमहोदय म्हणाले की, वंदे भारत आणि बुलेट ट्रेन तंत्रज्ञान पूर्णपणे वेगळे आहे.
बुलेट ट्रेन अन वंदे भारत दोन्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर धावतात. यावरून वंदे भारत मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरवर धावणार नाही. जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून बुलेट ट्रेन तयार केली जात आहे.
वैष्णव यांनी मुंबई – अहमदाबाद हाय स्पीड मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असल्याच्या बातम्यांना फेटाळून लावले आहे.
तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या E5 मालिकेतील शिंकानसेन मॉडेल (E-10 म्हणून ओळखले जाणारे) वापरण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले. हे मॉडेल भारत-जपान द्विपक्षीय करारांतर्गत आयात केले जाणार आहे.
या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जपानच्या एका पथकाने नुकतीच दिल्लीला भेट दिलीये. तसेच जपान वरून आलेल्या या पाहुण्यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.