Business Idea In Marathi : कोई भी धंदा छोटा नही होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता…हा चित्रपटातला डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल. पण मंडळी हा चित्रपटातला डायलॉग एका अर्थी खराच आहे. व्यवसाय कोणताही असो त्या व्यवसायात जर पूर्ण समर्पण असलं तर व्यवसायातून करोडपती सुद्धा होता येत.
दरम्यान जर तुम्ही नजिकच्या भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट बिझनेसचा प्लॅन देणार आहोत.
![Business Idea In Marathi](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Business-Idea-In-Marathi.jpeg)
जर तुम्हाला व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करायचे असेल तर तुम्ही हा बिझनेस नक्की सुरू करू शकता. महत्वाचे म्हणजे या व्यवसायाला बारा महिने मागणी असते. तसेच याची सुरुवात कमी पैशात करता येते आणि यातून मोठी कमाई करता येते.
कोणता आहे तो व्यवसाय?
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो एक या खाद्यपदार्थाशी संबंधित उत्पादनाचा व्यवसाय आहे, यातून तुम्ही कमी खर्चात लाखोंची कमाई करू शकता. चांगली गोष्ट म्हणजे तुमचा नफा दिवसेंदिवस वाढतचं राहणार आहे.
हमीच्या बिजनेस बाबत बोलत आहोत तो आहे सोया पनीर बनवण्याचा व्यवसाय. सोया पनीर तयार करण्यासाठी तुम्हाला प्लांट उभारावा लागणार आहे.
थोडी मेहनत आणि समजूतदारपणाने काम केलं, योग्य पद्धतीने मार्केटिंग केली तर तुम्ही या व्यवसायात स्वतःला एक ब्रँड म्हणून स्थापित करू शकता. सुमारे 3 ते 4 लाख रुपयांच्या गुंतवणुक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि यातून काही महिन्यांतचं लाखो रुपये कमवू शकता.
सोया पनीर कसा बनतो?
सोयापनीर बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. टोफू बनवण्याच्या प्रक्रियेत, प्रथम सोयाबीन ग्राईंड केले जाते म्हणजे मिक्सर मधून बारीक केले जाते आणि 1:7 च्या प्रमाणात पाण्यात मिसळले जाते आणि उकळले जाते.
बॉयलर आणि ग्राइंडरमध्ये 1 तास प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 4-5 लिटर दूध मिळते. या प्रक्रियेनंतर, दूध सेपरेटरमध्ये टाकले जाते जेथे दूध दह्यासारखे होते. यानंतर उरलेले पाणी त्यातून काढून टाकले जाते. या प्रक्रियेला सुमारे 1 तास लागतात अन यातून तुम्हाला अडीच ते तीन किलो सोया पनीर मिळतो.
किती गुंतवणूक करावी लागणार?
टोफू व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये लागतील. टोफू बनवण्यासाठी सुरुवातीला 3 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. बॉयलर, जार, सेपरेटर, स्मॉल फ्रीझर इत्यादींसाठी सुरुवातीची गुंतवणूक 2 लाख रुपये असेल. यासोबतच 1 लाख रुपयांत सोयाबीन खरेदी करावे लागणार आहे. टोफू बनवण्यासाठी तुम्हाला काही तज्ञांची देखील आवश्यकता राहणार आहे.
कमाई किती होणार
समजा, जर तुम्ही रोज 30-35 किलो टोफू बनवण्यात यशस्वी झालात, तर तुम्हाला दरमहा एक लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला या व्यवसायातून 12 लाख रुपयांपर्यंतची कमाई होणार आहे.