बिसलेरीसारखा स्वतःचा ब्रँड बनवा ! बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय सुरु करा अन महिन्याला कमवा लाखो, व्यवसायाची ए टू झेड माहिती एका क्लिकवर वाचा

दरवर्षी उन्हाळ्यात बाटलीबंद पाण्याची मागणी वाढत असते. बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात अनेक नामांकित ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात. यात सर्वात मोठा ब्रँड बिसलेरीचा आहे. दरम्यान आज आपण या व्यवसायाची सर्व माहिती अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Updated on -

Business Idea : नुकतीच मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे आणि देशातील अनेक भागात तापमानाने अनेक नवनवीन रेकॉर्ड कायम करण्यास सुरुवात केली आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक तापमान जाणवत असून यंदाच्या उन्हाळ्यात जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत.

खरतर दरवर्षी उन्हाळ्यात बाटलीबंद पाण्याची मागणी वाढत असते. बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात अनेक नामांकित ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात. यात सर्वात मोठा ब्रँड बिसलेरीचा आहे.

मात्र असे असले तरी या व्यवसायात फार मोठा स्कोप आहे आणि जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकता. दरम्यान आज आपण या व्यवसायाची सर्व माहिती अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पैकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा बिजनेस ठरणार फायद्याचा

खरेतर, पाणी हा जीवनाचा आधार आहे आणि दरवर्षी शुद्ध पाण्याची मागणी वाढत आहे. वाढत्या जलप्रदूषणामुळे शुद्ध पाणी ही नागरिकांची प्रमुख गरज बनली आहे. हेच कारण आहे की आता शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पैकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची गरज वाढत आहे, विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात बाटलीबंद पाण्याची मागणी वाढते. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील बाटलीबंद पाण्याची मागणी कायम असते मात्र उन्हाळ्यात याची मागणी या दोन्ही ऋतूंपेक्षा अधिक पाहायला मिळते.

वाढती लोकसंख्या आणि शुद्ध पाण्याची आवश्यकता; हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि कार्यालयांमध्ये बाटली बंद पाण्याची मागणी, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात अधिक वापर अन आरोग्याबद्दल वाढती जागरूकता या कारणांमुळे सध्या हा व्यवसाय फायद्याचा ठरत असून आगामी काळातही या व्यवसायातून चांगला नफा मिळणार आहे.

व्यवसायासाठी किती जागा लागणार?

या व्यवसायासाठी कमीत कमी दोन हजार स्क्वेअर फुट जागा लागणार आहे. तसेच या बिझनेससाठी विहीर, बोरवेल किंवा इतर पाण्याचे स्त्रोत लागणार आहेत. या व्यवसायासाठी विजेची आवश्यकता असते यामुळे या बिजनेस साठी तुम्हाला 24 घन्टा वीज लागणार आहे.

या मशीन्स लागणार

बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील मशीन्स लागणार आहेत

वॉटर फिल्ट्रेशन मशीन- पाणी स्वच्छ करण्यासाठी
बॉटल फिलिंग मशीन – बाटलीमध्ये पाणी भरण्यासाठी
कॅपिंग आणि लेबलिंग मशीन – सीलिंग आणि ब्रँडिंग बाटल्या
रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रणाली – पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी

हे लायसन्स सुद्धा लागणार

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला काही परवाने लागतील. जसे की, बीआयएस (भारतीय मानक ब्यूरो) परवाना, एफएसएसएआय (अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे प्रमाणपत्र ) प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी, जीएसटी नोंदणी.

किती गुंतवणूक करावी लागणार?

या व्यवसायासाठी तुम्हाला एकूण 15 ते 25 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे. जमिनीसाठी किंवा जमिनीच्या भाड्यासाठी तुम्हाला दोन ते पाच लाख रुपये, मशीन खरेदी करण्यासाठी आठ ते पंधरा लाख रुपये, लायसन्स आणि परमिट काढण्यासाठी एक ते दोन लाख रुपये आणि मार्केटिंग साठी तसेच ब्रँडिंग साठी तुम्हाला एक ते तीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो.

किती कमाई होणार ?

या बिझनेस मधून तुम्हाला एक लिटर पाण्याच्या एका बॉटल मागे जवळपास चार ते पाच रुपयांचा नफा राहू शकतो. अशा तऱ्हेने जर तुम्ही दिवसाला दोन हजार बॉटल विकल्यात तर तुम्हाला 2000×5 = 10000 रुपयांचा नफा मिळणार आहे. म्हणजे एका महिन्यात तुम्ही तीन लाख रुपयांचा नफा कमवणार आहात. वार्षिक आधारावर पाहिलं तर तुम्हाला या व्यवसायातून 36 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe