Business Idea : अलीकडे नोकरीपेक्षा व्यवसायाला अधिक पसंती दाखवली जात आहे. विशेषतः कोरोना काळापासून भारतात नवनवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत आणि महत्त्वाचची बाब म्हणजे जो मराठी माणूस आधी व्यवसायात कुठेतरी मागे होता, तो आता व्यवसायातून भरमसाठ कमाई सुद्धा करत आहे. मात्र, अनेकांची स्वतःची व्यवसाय सुरू करण्याची तयारी असताना देखील कोणता व्यवसाय सुरू करावा ? हे सुचत नाही.
दरम्यान, जर तुम्हीही अशाच स्टेजमध्ये असाल तुमच्याही मनात नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा ? याबाबत प्रश्न असतील तर तुमचे हे प्रश्न आज आम्ही सोडवणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा एका बिजनेस प्लॅनची माहिती सांगणार आहोत जो व्यवसाय सुरू करून तुम्ही कमी दिवसात लखपती होऊ शकतात.

कुरमुरे किंवा मुरमुरे बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला कमी दिवसात मालामाल बनवू शकतो. हा असा व्यवसाय आहे जो सुरू झाल्याबरोबर कमाई करता येते. अशा स्थितीत आज आपण या व्यवसायाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा सुरू करणार कुरमुरे बनवण्याचा व्यवसाय?
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल. कुरमुरे बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागतं? तर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) याबाबतचा एक प्रकल्प अहवाल तयार केला आहे ज्यात यासाठीच्या गुंतवणुकीची माहिती देण्यात आली आहे.
आयोगाने तयार केलेल्या अहवालानुसार, पफ्ड राईस मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी साधारणता 3 लाख 55 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. जर तुमच्याकडे एवढी मोठी रक्कम नसेल तर तुम्ही यासाठी कर्ज सुद्धा घेऊ शकता.
सरकारने याच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत यातून तुम्ही कर्जाची सोय करू शकता. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही देखील अशीच एक योजना असून या अंतर्गत तुम्हाला या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे.
कच्चा माल कुठून खरेदी करणार ?
भांडवल जमा झाले, मुरमुरे बनवण्यासाठी आवश्यक असणारे मशिन्स खरेदी केलेत की मग तुम्हाला यासाठीचा कच्चामाल खरेदी करावा लागणार आहे. कुरमुरे बनवण्यासाठी तांदूळ लागतो.
तांदूळ तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही मार्केटमधून सहजतेने खरेदी करू शकता. तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर शेतकऱ्यांकडून थेट तांदूळ खरेदी करून सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणते लायसन्स लागतात?
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही लायसन्स काढावे लागणार आहेत. हा बिजनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI कडून अन्न परवाना घ्यावा लागेल. तुम्हाला व्यवसायाची नोंदणी आणि जीएसटी नोंदणी सुद्धा करावी लागेल. ही नोंदणी करण्याआधी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे ब्रँड नेम ठरवावे लागणार आहे.
किती कमाई होणार?
कुरमुरे, मुरमुरे बनवण्यासाठी प्रति किलो दहा ते वीस रुपये खर्च करावा लागतो आणि हे मुरमुरे बाजारात सहजच 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने विकले जातात. काही ठिकाणी 45 रुपये प्रति किलोपर्यंत सुद्धा याला दर मिळतो आणि म्हणूनच हा व्यवसाय तुमच्यासाठी कुबेरचा खजानाच ठरणार आहे. या व्यवसायातून तुम्ही चांगली मोठी कमाई करू शकणार आहात.