Business Idea : तुम्हीही दररोजच्या नऊ ते पाच अशा कामाला कंटाळला आहात का ? महिन्याकाठी मिळणाऱ्या पगारात तुमचा संसाराचा गाडा चालवणे कठीण होत आहे का? मग तुमच्यासाठी बिझनेस हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. दरम्यान जर तुम्हाला नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर आजचा हा लेख तुम्ही वाचायलाच हवा. कारण ते आज आपण अशा काही भन्नाट बिजनेस प्लॅन बाबत माहिती पाहणार आहोत ज्यातून अगदी पहिल्या दिवसापासूनच मोठी कमाई करता येणार आहेत.
ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स विक्रीचा बिजनेस – जर तुमचे बजेट चार ते पाच लाख रुपयांचे असेल तर तुम्ही ऑरगॅनिक प्रॉडक्ट विक्रीचा बिजनेस सुरू करू शकता. अलीकडे लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. प्रत्येकालाच आपल्या आरोग्याची काळजी आहे. कोरोना काळापासून लोक आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

यामुळे जर तुम्हाला नवीन एखादा बिजनेस सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी ऑरगॅनिक प्रॉडक्ट विक्रीसाठी उत्कृष्ट पर्याय ठरणार आहे. लोक आता आरोग्याबाबत चांगलेच जागरूक झाले आहेत आणि आता रसायनमुक्त उत्पादने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सेंद्रिय डाळी, तेल, मसाले किंवा ब्युटी प्रॉडक्ट तयार करून विकू शकता. सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय घरून सुद्धा सुरू करता येतो.
होम बेकरी किंवा मिठाईचा व्यवसाय – पाच लाखांच्या आत तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सेटअप करायचा असेल तर हा बिजनेस देखील एक उत्तम पर्याय राहणार आहे. लोकांना ताजे, स्वच्छ, घरगुती अन्न अधिक आवडते. तुम्ही तुमच्या घरच्या स्वयंपाकघरातून बेकरी किंवा मिठाईचा व्यवसाय सुरू करू शकता. जर चव चांगली असेल तर तुम्हाला नियमित ग्राहक मिळतील आणि काही महिन्यांत तुमचा व्यवसाय वाढू लागेल.
फोटो आणि व्हिडिओ निर्मिती व्यवसाय – या यादीत तिसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय म्हणजे फोटो आणि व्हिडिओ मेकिंग बिजनेस. अलीकडे या व्यवसायाची मागणी सातत्याने वाढत आहे. सोशल मीडियाच्या या युगात हा बिजनेस मोठा हिट ठरतोय. लग्नसराई मध्ये तर या व्यवसायाला प्रचंड मागणी असते.
आज पासून देशात लग्नाचा सिझन सुरु झाला आहे आणि हा व्यवसाय पुन्हा मागणीत येणार आहे. तसेच सोशल मीडिया कंटेंट आणि जाहिरातींची मागणी सुद्धा सतत वाढत आहे. तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारणता पाच लाख रुपयांची इन्वेस्टमेंट करावी लागू शकते.
यामध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा लाईट आणि फोटो व्हिडिओ एडिटिंगचे साधन खरेदी करावे लागणार आहेत. कम्प्युटर लॅपटॉप सारख्या गोष्टी सुद्धा तुम्हाला घ्याव्या लागतील. तुम्हाला तुमचा छोटासा स्टुडिओ सुद्धा सेट करावा लागेल. तुम्ही स्टुडिओ घरी सेट केला तरी चालेल पण सेटअप तुम्हाला लागणारच आहे.
महत्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय पार्ट टाइम नाही तुम्ही बारा महिने हा व्यवसाय सुरू ठेवू शकता आणि महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. कारण वेडिंग व्हिडिओ फोटोग्राफरला नेहमीच मागणी असते.
प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसाय – आजकाल हा पण बिजनेस ट्रेंडिंगमध्ये आहे. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही टी-शर्ट, मग, बॅग किंवा कस्टमाइज्ड भेटवस्तू डिझाइन करू शकता. ऑर्डर मिळाल्यावरच उत्पादने तयार केली जातात, त्यामुळे इन्व्हेंटरी खर्च येत नाही.
विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू तयार करून त्या ऑनलाईन वेबसाईटवर विक्री करू शकता. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही इन्वेस्टमेंट करावी लागेल. वेबसाइट, डिझाइन आणि मार्केटिंगसह पाच लाख रुपयांच्या बजेट मध्ये तुम्हाला हा बिजनेस स्टार्ट करता येऊ शकतो.
डिजिटल मार्केटिंग एजन्सी – जर तुम्हाला सोशल मीडिया, कंटेंट आणि जाहिरात मोहिमांची चांगली समज असेल, तर डिजिटल मार्केटिंग एजन्सी हा बिझनेस फक्त तुमच्यासाठीच आहे. या सोशल मीडियाच्या युगात तुम्हाला या बिझनेस मधून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते.
हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत इन्व्हेस्टमेंट मात्र करावी लागणार आहे. लॅपटॉप, इंटरनेट आणि काही आवश्यक साधनांसाठी तुम्हाला सुरुवातीला खर्च करावा लागतो. एकदा खर्च केला की नंतर तुम्हाला योग्य मार्केटिंग करून या व्यवसायातून चांगला नफा मिळवता येणार आहे.
लहान व्यवसाय आणि ब्रँडना प्रमोशनची आवश्यकता असते. याच प्रमोशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बिझनेस मधून कमाई करू शकता. म्हणजे लोकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी केलेली मदत तुम्हाला पैसे देणार आहे.













