Business Ideas: स्वतःच्या पायावर उभं राहयचंय? फक्त 5000 रुपयांत सुरु करा ‘हे’ 5 उद्योग; मिळेल पैसाच पैसा

Published on -

Business Ideas – प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं रहायचं असतं. छोटा- मोठा उद्योग सुरु करुन, लाईफ सेटल करायची असते. मात्र कोणताही बिझनेस सुरु करायचा म्हटल्यावर पहिला प्रश्न पडतो, तो पैशांचा. कारण पैसा असल्याशिवाय उद्योग उभारता येत नाही. परंतु काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला फक्त 5000 रुपयांत सुरु होणारे असे व्यवसाय सांगणार आहोत, जे सुरु करुन तुम्ही कोट्यवधी रुपये कमवू शकता.

1. पर्यावरणपूरक पिशव्या

सध्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे. त्यामुळे छोट्या- मोठ्या व्यावसायिकांची अनेकदा गोची होते. प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असल्याने कापड आणि कागदी पिशव्यांकडे व्यापारी वळाले आहेत. या पिशव्यांची मागणी सध्या वाढली आहे. जुन्या, रद्दी वर्तमानपत्राच्या पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येतो. दुकानदारांना आणि ग्राहकांना थेट विकून हा व्यवसाय सहज ग्रीप धरु शकतो. यासाठी फक्त 5000 रुपये गुंतविण्याची आवश्यकता असते.

2. लाँन्ड्री व्यवसाय

सर्वात सोप्पा व्यवसाय म्हणजे लाँण्ड्री व्यवसाय. फक्त ड्रायक्लिनिंग किंवा रोल प्रेस वगैरे अत्याधुनिक सुविधा न देता फक्त साधे इस्त्रीचे कपडे देण्याचा व्यवसाय फक्त पाच हजार रुपयांत सुरु होऊ शकतो. आजकाल अनेकांकडे घरी कपडे धुण्यासाठी वाँशिंग मशिन असतात. फक्त कपडे इस्त्री करायला वेळ नसतो. अशा परिस्थितीत इस्त्री सेवा देणाऱ्यांची चांगली मागणी आहे. फक्त 5,००० रुपयांपासून हा व्यवसाय सुरू करता येतो.

3. पॅकिंग आणि लेबलिंग

ई-कॉमर्स कंपन्या आणि स्थानिक ब्रँडना घरबसल्या पॅकिंग आणि लेबलिंगचे काम देऊन तुम्ही पैसे कमवू शकता. फक्त 5,000 रुपयांना टेप, बॉक्स आणि स्केलिंग मशीन खरेदी करू शकता. यासाठी Amazon, Flipkart किंवा स्थानिक उत्पादकांशी संपर्क साधा. प्रत्येक पॅकवर त्याचा नफा 2 ते 5 हजार रुपयांपर्यंत असू शकतो.

4. ब्लॉगिंग

ब्लॉगिंग हा आजकाल सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. जिथे तुम्हाला फक्त तुमच्या वेबसाइटसाठी सामग्री तयार करायची आहे. तुम्ही तुमच्या वेबसाइटवर जितके जास्त आकर्षित कराल तितके जास्त पैसे तुम्ही जाहिरातींद्वारे कमवाल. तुम्ही मोठी रक्कम गुंतवल्याशिवाय ब्लॉगिंगद्वारे प्रचंड पैसे कमवू शकता.

5. स्नॅक्स व्यवसाय

चिप्स, नमकीन, भुजिया किंवा घरगुती कुकीजची मागणी नेहमीच असते. त्यासाठी लागणारे साहित्य, पॅकिंग पाउच आणि बॅनर फक्त 5 हजार रुपयांमध्ये घेता येतात. तुम्ही ते इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि स्थानिक दुकानांमधून सुरू करू शकता. त्याचे मार्जिन सहजपणे 40-50% पर्यंत असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News