सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये बजेट विभागामध्ये अनेक 5G असे स्मार्टफोन खरेदी करण्याकरिता तुम्हाला उपलब्ध असून हे सर्व फोन उत्कृष्ट डिझाईन आणि वैशिष्ट्यांसह येतात. हे फोन तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकतात व तीस हजार रुपयांचा जर तुमचा बजेट असेल तर हे स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम ठरतील.
या सर्व स्मार्टफोन मध्ये तुम्हाला महागड्या स्मार्टफोन सारखे फीचर्स आणि डिझाईन पाहायला मिळेल. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर यामध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरे देण्यात आलेले आहेत.
तसेच प्रत्येक स्मार्टफोन मध्ये उत्कृष्ट रॅम आणि स्टोरेज देण्यात आलेले आहे. हे फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही ॲमेझॉन वरून देखील ऑर्डर करू शकतात व ॲमेझॉन इंडिया सर्व स्मार्टफोनवर सूट आणि ऑफर देत आहे. तसेच या स्मार्टफोन्स वर ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत असून त्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकतात.
30000 अंतर्गत असलेली उत्कृष्ट मोबाईल फोन व त्यांची किंमत
1- विवो V30e 5G स्मार्टफोन– या फोनमध्ये प्रगत कॅमेरा तंत्रज्ञान तसेच स्लिक डिझाईन आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरी सारखे उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहे व हा सर्वोत्तम कॅमेरा स्मार्टफोन आहे. यामध्ये 50MP Sony IMX882 सेन्सर आहे जो उच्च रिझोल्युशन, उत्तम फोटो सेन्सिटिव्हिटी आणि चांगल्या प्रकाशासाठी ओळखला जातो.
तसेच उत्तम सेल्फीसाठी 50 मेगापिक्सलचा आय ऑटो फोकस कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
या फोनमध्ये FHD+ डिस्प्ले देण्यात आलेला असून यामध्ये तुम्हाला 5500mAh मोठी बॅटरी देण्यात आलेली आहे व सुपर बॅटरी सेव्हर मोड सह तुम्ही दिवसभर या फोनचा वापर करू शकता.
कनेक्टिव्हिटी साठी यामध्ये 5g सपोर्ट देण्यात आलेला असून जो फास्ट नेटवर्क स्पीड सह येतो. या फोनच्या आठ जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची किंमत 24 हजार 700 रुपये आहे.
2- वनप्लस 11R 5G( गॅलेक्टिक सिल्वर)- हा एक शक्तिशाली स्मार्टफोन असून उत्कृष्ट कॅमेरा क्षमता तसेच उच्च कार्यक्षमता चिपसेट सह येतो. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सह सोनी IMX890 सेन्सर असून जो 120 डिग्री फील्ड ऑफ व्हू सह आठ मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड कॅमेरा आहे जो लँडस्केप आणि विस्तृत शॉट्स कॅप्चर करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
हा एक उत्कृष्ट असा 5g फोन आहे. या फोनमध्ये क्लोजअप फोटोग्राफी करिता मॅक्रो लेन्स देण्यात आलेले आहेत व सेल्फी करीता इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन 16 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनची स्टोरेज क्षमता आठ जीबी रॅम आणि 128 जीबी इतकी असून त्याची किंमत 27 हजार 999 रुपये आहे.
3- वनप्लस नॉर्ड CE4( डार्क क्रोम)- हा फोन आठ जीबी रॅम तसेच 256 जीबी स्टोरेज सह उत्तम कार्यप्रदर्शन, डिझाईन आणि कॅमेरासह येतो. या फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली असून जी 100 वॅट superVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते व 30 मिनिटात शंभर टक्के चार्ज होते.
या फोनमध्ये आठ जीबी रॅम सह आठ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम विस्तारित असून त्यामुळे ॲप्स वेगाने स्विच आणि लोड केली जाऊ शकतात. 256 जीबी स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर हे एक्सपांडेबल स्टोरेज एक टीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येते.
हा एक सर्वोत्तम कॅमेरा स्मार्टफोन असून यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सह 50 मेगापिक्सल सोनी LYT-600(IMX882) सेन्सरसह येतो तसेच या फोनची किंमत 26998 इतकी आहे.