प्रत्येक वर्षी नवरात्र उत्सव किंवा दिवाळीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार खरेदी करण्याचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या कालावधीत अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून नवनवीन कार लॉन्च केल्या जातात आणि काही कारचे अपडेटेड व्हर्जन देखील सादर केले जातात.
त्यामुळे या कालावधीत जर एखाद्या ग्राहकाला कार खरेदी करायचे असेल तर त्याच्यापुढे अनेक प्रकारचे पर्याय आपल्याला कार बाजारपेठेमध्ये बघायला मिळतात व त्यातून एखाद्या कारची निवड करणे सोपे जाते. भारतामध्ये प्रामुख्याने टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या कार्सना खास करून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते व या दोन्ही कंपन्यांच्या वाहनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर ग्राहकांची संख्या मोठी आहे.

या अनुषंगाने जर तुम्हाला देखील या नवरात्रीमध्ये किंवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर स्वतःच्या घरासमोर कार असण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्ही टाटा मोटर्सची दिसायला डॅशिंग आणि दमदार अशी टाटा पंच खरेदी करू शकतात.
कंपनीच्या माध्यमातून ही कार कमीत कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून या कारमध्ये आता अनेक टॉप असे फीचर्स देण्यात आलेले आहेत.
सध्या ही कार खूप चर्चेत असून टाटा पंचमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे टाटा पंच कारच्या ॲडव्हेंचर परसोना या लोवर व्हेरियंटमध्ये सनरूफची सुविधा देखील आता कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. टाटा पंचच्या मॉडेलमध्ये आता काही बदल करण्यात आलेले असून पावर ट्रेन मात्र अगोदर जसा होता तसाच ठेवण्यात आलेला आहे. तसेच बाहेरील बाजूला देखील कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
टाटा पंचमध्ये मिळतील हे दमदार फीचर्स
या कारमध्ये आता 10.25 इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला असून या सिस्टमला वायरलेस अँड्रॉइड आणि एप्पल कार प्लेचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. तसेच टाटा पंचच्या सर्व व्हेरिएंट्स मध्ये ग्रँड कन्सोलसह वायरलेस चार्जर, आर्मरेस्ट, रियर एसी व्हेंट्स, टाईप सी फास्ट यूएसबी चार्जर देखील देण्यात आलेले आहे.
या कारमध्ये मिळणार आता सनरूफ
विशेष म्हणजे टाटा पंचच्या टॉप व्हेरियंट्स मध्ये अगोदर सनरूफ दिले गेलेले होते. परंतु आता या कारच्या ॲडव्हेंचर परसोना या मॉडेलमध्ये देखील कंपनीने इलेक्ट्रिक सनरुफ दिलेले आहे. तसेच वर जे काही फीचर्स सांगितले आहेत ते टाटा पंचच्या Accomplished आणि क्रिएटिव्ह परसोना या मॉडेलमध्ये मिळणार आहेत.
किती आहे या कारची किंमत?
टाटा कंपनीच्या या कारला आता सहा लाख 12 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमती पासून खरेदी करता येणे शक्य आहे तसेच या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत नऊ लाख 45 हजार रुपये पर्यंत जाते. तसेच यापेक्षा जास्त स्वस्तामध्ये देखील ही कार खरेदी करणे शक्य आहे. कारण कंपनीच्या माध्यमातून टाटा पंच खरेदीवर अठरा हजार रुपयेची सूट देखील कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.