CA Exam : जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 27 लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. लोकांना अगदी धर्म विचारून ठार मारण्यात आले आणि यामुळे संपूर्ण देशभरात दहशतवाद्यांच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली.
दरम्यान पहलगाम येथे झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील दहशतवाद्यांचे अड्डे उडवलेत. भारताने एयर स्ट्राइक करून कारवाई सुरु केली. या ऑपरेशनला भारताकडून सिंदूर ऑपरेशन असे नाव देण्यात आले.

महत्त्वाची बाब म्हणजे हे सिंदूर ऑपरेशन अजूनही सक्रिय असून भारताकडून पाकिस्तानावर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. याच साऱ्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती असून या तणावाचा देशातील विद्यार्थ्यांनाही फटका बसतोय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सीएच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक फारच महत्त्वाची बातमी ठरत आहे.
दरम्यान आता आपण सीए ची परीक्षा नेमकी कधी होणार, याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने काय सांगितले आहे? याचीच सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने काय सांगितले?
सध्या संपूर्ण देशभर भारत आणि पाकिस्तानातं निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीची चर्चा आहे. काल पाकिस्तानकडून भारतावर काही ठिकाणी ड्रोन आणले करण्यात आले आणि यालाच प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याकडून देखील पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन हल्ला करून पाकिस्तानला दणका देण्यात आला.
भारतीय सैन्याचा हा हल्ला फारच अचूक होता आणि यामुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. काल या परिस्थितीमुळे धर्मशाळा येथे सुरू असणारी आयपीएल मॅच मध्येच बंद करण्यात आली.
दरम्यान आता 09 मे 2025 ते 14 मे 2025 या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या सीएची मुख्य परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याच संदर्भात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने परिपत्रक सुद्धा निर्गमित केलेले आहे.
आता कधी होणार परीक्षा?
भारत अन पाकिस्तानमध्ये सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सियाची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सीए फायनल, इंटरमीडिएट आणि पीक्यूसी परीक्षांचे [इंटरनॅशनल टॅक्सेशन-असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी एटी)] मे 2025 चे उर्वरित पेपर्स म्हणजे 9 मे ते 14 मे या काळातील पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.
यामुळे आता ही मुख्य परीक्षा कधी होणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र सध्या ही परीक्षा फक्त रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचे सुधारित वेळापत्रक अजून रेडी झालेले नाही.
पण लवकरच याबाबत संस्थेकडून सुधारित वेळापत्रक जाहीर होणार आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी ICAI च्या अधिकृत वेबसाइट www.icai.org या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.