ब्रेकिंग ! ‘या’ बँकेत निघाली तब्बल 3000 रिक्त पदांसाठी मेगा भरती, उद्यापासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया, कोण राहणार पात्र ? वाचा…

मिळालेल्या माहितीनुसार कॅनरा बँकेत विविध रिक्त पदांच्या 3000 जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील बँकेकडून निर्गमित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठीची अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुमचेही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.

Tejas B Shelar
Updated:
Canara Bank Bharati 2024

Canara Bank Bharati 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेषतः जे तरुण बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की देशातील एका प्रमुख बँकेत एक मेगा भरती निघाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॅनरा बँकेत विविध रिक्त पदांच्या 3000 जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

यासाठीची अधिसूचना देखील बँकेकडून निर्गमित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठीची अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

त्यामुळे जर तुमचेही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. दरम्यान आज आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या अन किती पदांसाठी होणार भरती?

कॅनरा बँकेत शिकाऊ पदासाठी ही भरती होणार आहे. ज्यांना ॲप्रेंटिसशिप करायची असेल त्यांच्यासाठी नक्कीच ही एक मोठी संधी राहणार आहे. या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 3000 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमधून पदवीधारक उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयोमर्यादा काय?

या पदासाठी 20 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. म्हणजेच वीस वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार नाही. परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

पगार किती मिळणार?

या पदभरती अंतर्गत ॲप्रेंटिसशिपसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना 15 हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी अजून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र उद्यापासून अर्थातच 21 सप्टेंबर पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. canarabank.com या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यापूर्वी nats.education.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक?

21 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि इच्छुक उमेदवारांना 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विहित मुदतीत आलेल्या अर्जांवरच विचार केला जाणार आहे. विहित मुदतीनंतर सादर झालेल्या अर्जांवर कोणत्याही सबबीवर विचार होणार नाही, असे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe