Canara Bank FD Interest Rate : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण कॅनरा बँकेच्या फिक्स डिपॉझिटची माहिती पाहणार आहोत. फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून ओळखला जातो. शिवाय अलीकडे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतोय.
विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांना फिक्स डिपॉझिटवर गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळतोय. अशा स्थितीत, आज आपण कॅनरा बँकेच्या चार वर्षांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कॅनरा बँकेच्या चार वर्षांच्या एफडी योजनेची सविस्तर माहिती.

कॅनरा बँकेच्या 4 वर्षांची एफडी योजनेवरील व्याजदर !
कॅनरा बँकेच्या 4 वर्षांच्या एफडी योजनेवर सामान्य ग्राहकांना वेगळे व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांवरील नागरिकांसाठी वेगळे व्याजदर लागू आहे. या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.40% वार्षिक व्याजदराने परतावा दिला जात आहे.
दुसरीकडे, याच कालावधीत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा ग्राहकांना 0.50% अतिरिक्त व्याजदर लागू आहे म्हणजेच अशा ग्राहकांना या एफडीवर 7.90% दराने परतावा दिला जातोय.
3 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
कॅनरा बँकेच्या चार वर्षांच्या एफडी योजनेत तीन लाखाचे गुंतवणूक केल्यास सामान्य ग्राहकांना 7.40% व्याजदराने चार लाख 2 हजार 252 रुपये मिळतील यामध्ये गुंतवणुकीची रक्कम वजा करता गुंतवणूकदाराला एक लाख 2 हजार 252 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
याच योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी तीन लाख रुपये इन्वेस्ट केल्यास त्यांना चार लाख दहा हजार 224 रुपये मिळणार आहेत म्हणजेच एक लाख दहा हजार 224 रुपये त्यांना व्याज मिळेल.
4 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
कॅनरा बँकेच्या चार वर्षांच्या एफडी योजनेत चार लाखाची गुंतवणूक केल्यास सिनिअर सिटीजन ग्राहकांना 7.90% दराने 5 लाख 46,965 रुपये मिळणार आहेत, म्हणजे एक लाख 46,965 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहे. सामान्य ग्राहकांना मात्र 7.40% दराने पाच लाख 36 हजार 335 रुपये मिळणार आहेत. अर्थातच 36 हजार 335 रुपये रिटर्न मिळणार आहेत.
5 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
4 वर्षांच्या या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांनी पाच लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर मॅच्युरिटी वर सहा लाख 70 हजार 419 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एक लाख 70 हजार 419 रुपये व्यास स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी या एफडी योजनेमध्ये पाच लाख गुंतवले तर त्यांना 7.90% दराने 6 लाख 83 हजार 706 रुपये परत मिळणार आहेत. म्हणजेच 1 लाख 83 हजार 706 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
10 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
चार वर्षांच्या या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांनी दहा लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर 13 लाख 40 हजार 839 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच तीन लाख 40 हजार 839 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
चार वर्षांच्या या एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी दहा लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर 13 लाख 67 हजार 412 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच तीन लाख 67 हजार 412 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.