कॅनरा बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

तुम्हालाही फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण कॅनडा बँकेच्या फिक्स डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत. कॅनडा बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? याचा आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत.

Published on -

Canara Bank FD Scheme : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण कॅनरा बँकेच्या फिक्स डीपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत. कॅनरा बँकेच्या बारा महिन्यांच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या काय दराने परतावा मिळतोय याचाच आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

खरंतर अनेकजण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट साठी फिक्स डिपॉझिटला प्राधान्य दाखवतो. सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी फिक्स डिपॉझिटचा पर्याय नक्कीच फायद्याचा ठरतो.

दरम्यान, जर तुम्हालाही 365 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी कॅनरा बँकेचा पर्याय बेस्ट राहणार आहे कारण की ही बँक इतर काही बँकांच्या तुलनेत आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याजदर ऑफर करत आहे.

कॅनरा बँकेचे एका वर्षाच्या एफडी योजनेचे व्याजदर

कॅनरा बँक ही पब्लिक सेक्टर मधील एक महत्त्वाची बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर करत आहे. या बँकेकडून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 4% पासून ते 7.71% दराने परतावा दिला जात आहे.

या बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर कॅनरा बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांना 6.75 टक्के दराने परतावा दिला जातोय.

दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांना बारा महिन्यांच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.25 टक्के दराने परतावा दिला जातोय.

अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

कॅनरा बँकेच्या 12 महिन्यांच्या एफडी योजनेत जर अडीच लाखांची गुंतवणूक केली तर सामान्य ग्राहकांना 6.75 टक्के दराने दोन लाख 67 हजार 307 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 17,307 रुपये व्याज म्हणून त्यांना रिटर्न मिळतील.

जर समजा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी 12 महिन्यांच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.25 टक्के दराने दोन लाख 68 हजार 624 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 68,624 रुपये त्यांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe