Canara Bank FD Scheme : शेअर मार्केट मधील घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवले जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बचत योजनांमध्ये आणि बँकेच्या FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
दरम्यान जर तुम्हीही बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण कॅनडा बँकेच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेबाबत माहिती पाहणार आहोत.

या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना किती व्याज दिले जाते, यात तीन लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? याचा आढावा घेणार आहोत.
कशी आहे कॅनडा बँकेची तीन वर्षांची एफडी योजना?
कॅनडा बँक आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडी योजनेवर सध्या स्थितीला 7.40% व्याजदराने परतावा देत आहे. हे व्याजदर सामान्य ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहेत.
ज्या ग्राहकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना बँकेकडून याच कालावधीच्या एफडीवर 7.90% व्याजदराने परतावा दिला जात आहे.
आता आपण कॅनरा बँकेच्या याच तीन वर्षांच्या एफडी योजनेत तीन लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याच कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.
तीन लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
कॅनरा बँकेच्या 3 वर्षांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांनी म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांनी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.40% व्याजदराने तीन लाख 73 हजार 812 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच 73 हजार 812 रुपये इतके रिटर्न मिळणार आहेत. जर समजा याच एफडी योजनेत साठ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सिनिअर सिटीजन ग्राहकांनी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना तीन लाख 79 हजार 355 इतके मिळणार आहेत.
अर्थात सीनियर सिटीजन ग्राहकांना 79 हजार 355 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहे. म्हणजे सामान्य ग्राहकांच्या तुलनेत सीनियर सिटीजन ग्राहकांना या एफ डी योजनेतून चांगला परतावा मिळणार आहे.