एसबीआय, एचडीएफसी की आयसीआयसीआय कोणती बँक देते सर्वात स्वस्त कार लोन ?

स्वप्नातील कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मोठ्या मेहनतीने पैसे जमवतो. मात्र कार खरेदीसाठी आवश्यक असणारा पैसा जेव्हा जमत नाही अशावेळी आपण कार लोन घेऊन कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करतो. यामुळे जर तुम्ही ही कार लोन घेऊन कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू इच्छित असाल तर एचडीएफसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय या तीन बड्या बँकांपैकी कोणते बँक सर्वात स्वस्त कार लोन देते याविषयी जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Car Loan

Car Loan : जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील प्रमुख तीन बॅंकेच्या कार लोन बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. या तिन्ही बँकेच्या कार लोनची आज आपण तुलना करणार आहोत जेणेकरून ग्राहकांना कोणती बँक स्वस्त कार लोन देते याची कल्पना येऊ शकेल.

खरे तर प्रत्येकाचे आपल्या घरासमोर एक कार उभी असावी असे स्वप्न असते. स्वप्नातील कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मोठ्या मेहनतीने पैसे जमवतो. मात्र कार खरेदीसाठी आवश्यक असणारा पैसा जेव्हा जमत नाही अशावेळी आपण कार लोन घेऊन कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करतो.

यामुळे जर तुम्ही ही कार लोन घेऊन कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू इच्छित असाल तर एचडीएफसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय या तीन बड्या बँकांपैकी कोणते बँक सर्वात स्वस्त कार लोन देते याविषयी जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

एसबीआय बँकेचे कार लोनचे व्याजदर : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. भारतात एकूण 12 सरकारी बँका असून यात एसबीआय सर्वाधिक मोठी बँक म्हणून ओळखले जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 9.15% ते 10.10% या व्याजदराने कार लोन उपलब्ध करून देत आहे.

एचडीएफसी बँकेचे कार लोनचे व्याजदर : ज्याप्रमाणे एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे त्याचप्रमाणे एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. ही देशातील एक सर्वात सुरक्षित बँक म्हणूनही ओळखली जाते.

हे बँक किमान 9.40% व्याजदरात आपल्या ग्राहकांना कार लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र कमीत कमी व्याजदरात जर कार लोन घ्यायचे असेल तर सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक असते.

आयसीआयसीआय बँक : मिळालेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना किमान 9.10% इंटरेस्ट रेट वर कार लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र या व्याजदरात फक्त अशाच ग्राहकांना कार लोन उपलब्ध करून दिले जात आहे ज्यांचा सिबिल स्कोर हा उत्तम असतो.

सिबिल स्कोर उत्तम असेल तर आयसीआयसीआय बँकेकडून कमी इंटरेस्ट रेटवर कार लोन दिले जाते. आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe