Car Parking Rule: पार्किंग दाखवा तरच गाडी घ्या… काय आहे महाराष्ट्रातला नवा कायदा? वाचा

Published on -

Car Parking Rule: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. आता राज्यात कोणतेही नवीन वाहन नोंदणी करताना महानगरपालिका संस्थेकडून पार्किंगची जागा उपलब्ध असल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे. जर असा पुरावा नसेल तर नवी कार घेता येणार नाही. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा नवा नियम करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे नियम?

एमएमआर क्षेत्रातील वाढत्या पार्किंग समस्येच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नवीन पार्किंग धोरणाबाबत सोमवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, महानगरपालिका संस्थेकडून पार्किंगची जागा मिळाल्याचा पुरावा दाखवल्यानंतरच आता वाहन नोंदणी करता येईल. गाडी ठेवण्यासाठी जागा नसेल, तर गाडी खरेदी करता येणार नाही. या निर्णयानंतर नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना आता पार्किंगच्या प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागणार आहे.

काय दिला इशारा?

मंत्री सरनाईक म्हणाले, “राज्यात नवीन पार्किंग स्पॉट्स तयार केले जाणार आहेत. सदनिका बांधताना बांधकाम व्यावसायिकांना पार्किंगची जागा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरेदीदाराकडे महानगरपालिकेकडून पार्किंग वाटप प्रमाणपत्र नसेल, तर त्याचे वाहन नोंदणीकृत केले जाणार नाहीत. नवीन वाहन खरेदी करताना पार्किंग प्रमाणपत्र दाखवाले लागणार आहे.

जगभरात आहे नियम

सरनाईक यांनी पॉड टॅक्सी नेटवर्क राबविण्याचाही उल्लेख केला. महाराष्ट्र सरकार मीरा-भाईंदर आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्येही अशीच पॉड टॅक्सी सुविधा सुरू करण्याची योजना आखत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नवीन कार खरेदी करण्यासाठी पार्किंग प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याबाबत त्यांनी सांगितले की, हा नियम जपानमध्ये पुर्वीपासून आहे. गाडी खरेदी करण्यापूर्वी गाडी पार्क करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध आहे का याची खात्री जगभरात केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News