देशातील ‘या’ शहरात कांदा-बटाट्याच्या भावात मिळतात काजू बदाम ! इथं काजूचा रेट फक्त 30-40 रुपये किलो

देशात सध्या काजूचे दर 900 ते 1 हजार रुपये प्रति किलो च्या दरम्यान आहेत. देशातील विविध भागांमध्ये हाच रेट आपल्याला पाहायला मिळतो, आपल्या राज्यातही याचं भावात काजू मिळतो. आपल्याकडे कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन होते तरीही त्याचे दर 900 ते 1000 रुपये प्रति किलो यादरम्यान असतात. पण आज आपण देशातील अशा एका ठिकाणाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे काजू फक्त 40 ते 50 रुपये प्रति किलो मध्ये मिळतात.

Published on -

Cheapest Dry Fruit Market : तुम्हालाही काजू बदाम सारखे ड्रायफ्रूट्स खायला आवडतात का? मग आजचा हा लेख तुमच्याच कामाचा आहे. खरेतर आपल्या सर्वांना हे माहितचं आहे की ड्राय फ्रुट जेवढे खायला रुचकर आणि चविष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात.

ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या पदार्थांमध्ये विशेषतः मिठाई बनवताना मोठ्या प्रमाणात वापरले जातात. ड्राय फ्रुट्स मध्ये काजू आणि बदामला सर्वाधिक मागणी असते आणि काजू आणि बदामचे रेट देखील अधिक असतात. दरम्यान डॉक्टर देखील ड्रायफ्रूटचा आपल्या आहारात समावेश करायला हवा असा सल्ला देतात.

एखाद्या व्यक्तीस कमकुवतपणा असल्यास किंवा त्याची दृष्टी वाढविण्यासाठी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी या सर्व गोष्टींमध्ये काजू हे ड्रायफ्रूट फारच फायदेशीर असल्याची माहिती आहार तज्ञांनी दिलेली आहे.

मात्र काजू आणि बदामच्या किमती या फारच अधिक असतात, सध्या भारतातील विविध राज्यांमध्ये काजूचे रेट हे 1000 रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत. तर काही ठिकाणी भेसळयुक्त काजू सुद्धा उपलब्ध होत आहेत.

असे काजू ग्राहकांना 700 ते 800 रुपये प्रति किलो या दरात विकले जातात. मात्र आज आपण अशा एका जागेची माहिती जाणून घेणार आहोत जिथे काजू फारच स्वस्तात मिळतात. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी मिळणारे काजू हे पूर्णतः शुद्ध आणि चांगल्या क्वालिटीचे असतात.

कुठे मिळतात स्वस्त काजु

भारतातील अनेक राज्यांमध्ये काजूचे रेट हे एक हजार रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत. आपल्या राज्यातही काजूचा भाव एक हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र आपल्या देशात असे एक ठिकाण आहे जिथे काजूचे रेट हे फारच कमी आहेत अगदीच कांदा बटाट्याच्या भावात या ठिकाणी काजू उपलब्ध होतो.

देशातील हे सर्वात स्वस्त ड्रायफ्रूट्स मार्केट झारखंड राज्यात असल्याची माहिती हाती आली आहे. झारखंड राज्यातील जामताड़ा येथे सर्वात स्वस्त काजू मिळतात. खरे तर जामताडा याला काजूची नगरी म्हणून ओळखतात. कारण म्हणजे या ठिकाणी काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात काजूची शेती करतात आणि या ठिकाणचे हवामान हे काजूच्या शेतीसाठी विशेष अनुकूल असून यामुळे यांना अधिकचे उत्पादन मिळते. येथे दरवर्षी हजारो टन काजूचे उत्पादन होते आणि यामुळे या ठिकाणी काजूचा भाव हा फारच कमी असल्याची माहिती जाणकारांकडून मिळाली आहे.

जामताडा मधील काजुचा भाव कसा आहे?

देशातील इतर ठिकाणी काजूचा रेट हा 900 ते 1000 रुपये प्रति किलो असा आहे मात्र झारखंड राज्यातील या भागात काजूचा रेट फक्त 40 ते 50 रुपये प्रति किलो असा असल्याचा दावा केला जातोय. असे म्हणतात की या भागात स्थानिक लोक रस्त्याच्या किनाऱ्यावर काजू आणि बादाम टोपल्यांमध्ये घेऊन विकतात. म्हणजेच या ठिकाणी काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आणि याचमुळे येथे काजूचे रेट हे कमी आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe