‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त Top 5 इलेक्ट्रिक कार ! 400 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज आणि किंमत फक्त…..

तुम्हालाही नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे का ? मग आज आम्ही तुमच्यासाठी भारतातील सर्वाधिक स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणत्या आहेत याची माहिती घेऊन आलो आहोत.

Published on -

Cheapest Electric Car : अलीकडील काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत.

शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी आता चार्जिंग स्टेशन सुद्धा विकसित होत आहेत आणि यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ आगामी काळात आणखी वाढेल अशी आशा आहे.

इलेक्ट्रिक वाहन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. म्हणूनच सरकार कडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारकडून सबसिडी सुद्धा दिली जाते.

पण तुम्हाला भारतातील सर्वाधिक स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणत्या याची माहिती आहे का ? नाही मग आज आपण देशातील सर्वात स्वस्त Top 5 इलेक्ट्रिक कार बाबत माहिती पाहणार आहोत.

देशातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 इलेक्ट्रिक कार 

Tata Tigor EV : देशातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 इलेक्ट्रिक कारच्या यादीत टाटा कंपनीची Tata Tigor EV ही सेडान कार पाचव्या स्थानी येते. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा चार्जिंग केल्यानंतर ही गाडी 315 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते.

किमतीच्या बाबतीत ही गाडी मध्यमवर्गीयांसाठी देखील किफायतशीर ठरते. भारतीय कार मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 12.49 लाख रुपये इतकी आहे. मात्र ही गाडीची एक्स शोरूम किंमत आहे ऑन रोड प्राईस यापेक्षा थोडी अधिक राहते.

Citroen eC3 : देशातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 इलेक्ट्रिक कारच्या यादीत ही गाडी चौथ्या क्रमांकावर येते. जर तुम्हाला बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर तुमच्यासाठी या गाडीचा पर्याय बेस्ट राहणार आहे. मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून ही गाडी डिझाईन करण्यात आली असून या गाडीची ड्रायव्हिंग रेंज शानदार आहे.

फ्रेंच कंपनी Citroen ची ही इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यानंतर 320km पर्यंत धावू शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. किमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.50 लाख रुपये इतकी आहे.

Tata Punch EV : इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता भारतीय कार मार्केटमध्ये सध्या टाटा कंपनी एक मोठा ब्रँड बनली आहे. या कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ इतर कंपन्यांपेक्षा मोठा आहे. दरम्यान कंपनीची टाटा पंच EV ही एक लोकप्रिय गाडी ठरली आहे. या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 421 km पर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीकडून केला जातो. याच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.99 लाख रुपये इतकी आहे. म्हणूनच ही गाडी देशातील सर्वाधिक स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते.

Tata Tiago EV : टाटा मोटर्सची आणखी एक इलेक्ट्रिक कार या यादीत येते. Tata Tiago EV ही गाडी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये एवढी आहे. गाडीच्या ड्रायव्हिंग रेंज बाबत बोलायचं झालं तर एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 315 किलोमीटर पर्यंत धावते असा दावा करण्यात आला आहे.

MG Comet EV : भारतातील सर्वाधिक स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या यादीत ही गाडी पहिल्या क्रमांकावर येते. ही गाडी देशातील सर्वाधिक स्वस्त इलेक्ट्रिक गाडी आहे. या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.50 लाख रुपये इतकी आहे आणि ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 230 किलोमीटर पर्यंत धावते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe