शंभुरायांची शौर्यगाथा मांडणारा छावा आता ओटीटीवर ! JioHotstar, Netflix की Amazon Prime ; कुठं रिलीज होणार ? पहा….

शंभुरायांची शौर्यगाथा मांडणारा छावा चित्रपट लवकरच ओटीटी सबस्क्राईबरच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 11 तारखेला ओटीटीवर रिलीज होऊ शकतो अशा चर्चांना ऊत आला आहे.

Published on -

Chhaava OTT Release : शिवरायांचा छावा, स्वराज्याचे धाकले छत्रपती यांचा धगधगता इतिहास, शंभूराजांची शौर्यगाथा मांडणारा “छावा” चित्रपट सध्या संपूर्ण हिंदुस्थानात गाजतोय. आपल्या राजाने आपल्यासाठी काय केलं? हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रात निश्चितच जबरदस्त यश मिळणार होते आणि ते मिळाले.

पण, महाराष्ट्राबाहेर सुद्धा हा चित्रपट फारच गाजलाय. तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये, जिथे हिंदी चित्रपट फारसे चालत नाहीत त्या राज्यांमध्ये सुद्धा छावा चित्रपटाने लोकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. छावा चित्रपट थिएटर मध्ये रिलीज होऊन तब्बल 52 दिवसांचा काळ उलटला आहे.

महत्त्वाचे म्हणजे या 50 ते 52 दिवसांच्या काळात या चित्रपटाने करोडो रुपयांची कमाई केली असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे सर्वच ठिकाणी कौतुक केले जात आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेलाय.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ला सिनेरसिकांनी भरभरून प्रेम दिलं. यामध्ये विक्की कौशलनं छत्रपती शंभू राजांची भूमिका साकारली होती. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली होती आणि मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला होता.

हा चित्रपट चित्रपटगृहात चांगला गाजला आहे अन म्हणूनच अनेकांच्या माध्यमातून हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार असा सवाल उपस्थित होतोय. काही लोकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघितलाच आहे पण आता त्यांना ओटीटीवर सुद्धा याला पाहायच आहे.

दरम्यान जर तुम्हीही छावा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला चित्रपटप्रेमींनी खूप प्रेम दिलं.

आता विक्की कौशलचा सुपरहिट चित्रपट ‘छावा’ लवकरच ओटीटीवर येणार आहे. चित्रपटाचं थिएटर रन संपल्यानंतर लवकरच निर्माते ओटीटीवर चित्रपटाचा प्रीमियर करतील. ‘छावा’ 11 एप्रिल रोजी ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

11 एप्रिल 2025 रोजी हा चित्रपट नेटफ्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. मात्र अजूनही याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट खरंच ओटीटीवर 11 तारखेला रिलीज होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News