मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याचा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

तुम्हीही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ? याबाबत माहिती पाहणार आहोत.

Updated on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मे महिन्याचा निधी लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार अशी खात्रीलायक बातमी प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. खरे तर एप्रिल महिन्याचा लाभ दोन आणि तीन मे रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आणि यामुळे मे महिन्याचा लाभ हा जून महिन्यात जमा होणार की काय ? अशी भीती महिलांना होती. झाले देखील तसेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्यात जमा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जून महिन्याचा पहिला आठवडा आता संपतोय आणि तरीही याचा लाभ अजून महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.

यामुळे लाडक्या बहिणी मे महिन्याचा पैसा कधी खात्यात जमा होणार ? अशी विचारणा करत आहेत आणि याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 10 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे. यासाठी एकूण 419.30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी मान्यता सुद्धा दिली आहे. मात्र हा निधी या योजनेच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

दरम्यान आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता वर्ग करण्यासाठी 419.30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून सदर निधी थेट महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याची कार्यवाही लवकरच सुरु होणार आहे. विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) गुरुवारी जारी केला असून त्यात असे सांगितले आहे की, हा निधी केवळ अनुसूचित जातीतील पात्र महिलांसाठी वापरण्यात येईल. योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना जीवनाच्या विविध स्तरांवर आधार देणे हा आहे. खरेतर, याआधीच लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 3,960 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता.

यामधूनच मे महिन्याचा 410 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. हे अनुदान महिला व बालविकास विभागाला अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती संबंधित शासन निर्णयामधून समोर आली आहे. खरेतर, गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, राज्य शासन महिलांच्या आर्थिक, सामाजिक व वैयक्तिक विकासासाठी या योजनेंतर्गत ठोस पावले उचलत आहे. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हफ्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe