खराब सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाहीये का ? मग ‘या’ टिप्स फॉलो करा अन Cibil Score सुधारा

तुम्हीही एखाद्या बँकेकडून कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? मग तुम्ही तुमचा सिबिल स्कोर चांगला मेंटेन ठेवायला हवा. सिबिल स्कोर चांगला असेल तेव्हाच बँकेकडून कर्ज मंजूर होते. दरम्यान जर सिबिल स्कोर खराब असेल तर तो कसा सुधारायचा याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.

Published on -

Cibil Score : आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज काढलेले असते तर काही जण आगामी काळात कर्ज घेण्याचा विचारात असतील, दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, बँका कर्ज मंजूर करण्यापूर्वी सिबिल स्कोर चेक करत असतात.

सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकांकडून सहजतेने कर्ज मंजूर केले जाते मात्र जर सिबिल स्कोर कमी असेल तर बँकांकडून कर्ज मंजूर केले जात नाही. तसेच जर कमी सिबिल स्कोर असल्यास कर्ज मंजूर झाले तरी अशा कर्जासाठी अधिकचे व्याज भरावे लागू शकते.

यामुळे सिबिल स्कोर हा नेहमी चांगला असायला हवा. सिबिल स्कोर 300 ते 900 दरम्यान ला जातो. सिबिल स्कोर व्यक्तीच्या क्रेडिट हिस्टरी ची माहिती सांगतो तसेच व्यक्तीच्या कर्ज परतफेडीची क्षमता सुद्धा दर्शवत असतो. यामुळे कर्ज मंजूर करताना सिबिल स्कोर बँकांच्या माध्यमातून पहिले चेक केला जातो.

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा

जाणकार लोक सांगतात की, आपल्या आर्थिक आरोग्यासाठी सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. सिबिल स्कोरमध्ये पुनर्भरण इतिहासाचा सुमारे 35% वाटा असतो. त्यामुळे सिबिल स्कोर खराब होऊ नये असे वाटत असेल तर वेळेवर क्रेडिट कार्ड बिल आणि कर्जाच्या ईएमआयचे पेमेंट करणे अत्यावश्यक ठरते.

वेळेवर पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर सुधारतो. दरम्यान तुम्ही तुमच्या मासिक EMI साठी ऑटो-पे सुविधा वापरली पाहिजे, असे केल्यास तुमच्या बँक खात्यातून आपोआप अन वेळेवर पेमेंट करता येणे शक्य आहे.

तसेच, जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल आणि कोणत्याही कारणाने EMI ला उशीर होणार असेल, तर तात्काळ बँकेशी संपर्क साधून तुम्ही नवीन पेमेंट योजना ठरवायला हवी. जेणेकरून डिफॉल्ट टाळता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रेडिट युज रेशो ज्याला Credit Utilization Ratio म्हणजे CUR म्हणतात.

CUR म्हणजे वापरलेली रक्कम व एकूण क्रेडिट मर्यादेचा प्रमाण. दरम्यान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्याने हे प्रमाण 30% पेक्षा कमी ठेवणे आवश्यक आहे, असे केल्याने सिबिल स्कोअर चांगला मेंटेन करता येतो. उदाहरणार्थ, तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा 1 लाख रुपये असल्यास एका महिन्यात 30 हजारांपर्यंतच खर्च करा, पण यापेक्षा जास्त खर्च चुकूनही करू नका.

तसेच जर तुमचा खर्च जास्त होत असेल तर बँकेचा क्रेडिट लिमिट वाढविण्याचा पर्यायही तुम्ही विचारात घ्यायला हवा. दरम्यान, जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्यात तर तुमचा सिबिल स्कोर नक्कीच सुधारणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe