CIBIL Score:- एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवली तर तुम्ही बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडे कर्जासाठी अर्ज करतात. अशावेळी संबंधित कर्ज देणाऱ्या संस्थांकडून सिबिल स्कोर म्हणजे त्याचा क्रेडिट स्कोर अगोदर तपासला जातो.व्यक्तीचा सिबिल स्कोर जितका उत्तम असेल तितके त्याला जलद गतीने कर्ज मिळू शकते. साधारणपणे सिबिल स्कोर जर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कुठल्याही वित्तीय संस्थेच्या माध्यमातून कर्ज मंजूर केले जाते. परंतु कर्ज मंजूर करण्यासाठी सिबिल स्कोर व्यतिरिक्त बँकांच्या माध्यमातून काही इतर महत्त्वाच्या बाबी देखील तपासल्या जातात व त्याची देखील खूप महत्त्वाची भूमिका ही कर्ज मंजुरीमध्ये असते. चला तर मग या संबंधीची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण बघू.
सिबिल स्कोर चांगला असताना कोणत्या कारणाने कर्ज मिळत नाही?
आपल्याला माहित आहे की कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँक व्यक्तीचा क्रेडिट स्कोर तपासतात. हा तीन अंकी स्कोर कर्ज मंजुरीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. परंतु सिबिल स्कोर चांगला असला तरी देखील बँक आणि इतर कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था यावर अवलंबून न राहता कर्ज मंजूर करताना संबंधित व्यक्तीची उत्पन्नाचे स्थिरता कशी आहे हे देखील तपासात असते. तसेच त्या व्यक्तीवर आधी असलेली कर्जे तसेच त्याची खर्च करण्याची सवय आणि आर्थिक शिस्त वित्तीय संस्था कडून पाहिली जाते. सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असला तरी व्यक्तीचा उत्पन्नाचा मोठा भाग जर आधी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांमध्ये जात असेल तरी देखील कर्ज नाकारले जाण्याची शक्यता अधिक असते. बऱ्याचदा उत्पन्नाचा 50 ते 60 टक्के हिस्सा हा आधी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यामध्ये जातो व अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीची कर्ज परतफेड क्षमता ही मर्यादित मानली जाते.

यामध्ये सर्वात महत्त्वाचे काय?
बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा नियमित आणि विश्वासार्ह उत्पन्नाला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत असते. व्यक्ती एखाद्या मोठ्या आणि विश्वासार्ह कंपनीमध्ये दीर्घकाळ काम करत असेल तर अशांना कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याउलट फ्रीलान्सर आणि हंगामी कामगारांना कर्ज देताना बँक व वित्तीय संस्था आखडता हात घेतात व अधिक तपासणी करतात. बँक अशा व्यक्तींकडे कर विवरणपत्र किंवा बँकेचे स्टेटमेंट आणि व्यवसाय असेल तर त्यामधील सातत्याची पुरावे मागू शकते.
अशा परिस्थितीत कर्ज कसे मिळवावे?
यामध्ये जो व्यक्ती करता येतो त्याची आर्थिक शिस्त ही त्याच्या सिबिल स्कोर पेक्षा अनेक अर्थाने महत्त्वाची ठरते. तारण तसेच नियमित बचत आणि कमी डेट टू इन्कम रेशो असेल तर कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या गोष्टींवर सगळ्यात अगोदर लक्ष द्यावे.