Cibil Score : आपल्या आर्थिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेता, CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर टिकवणे आवश्यक आहे. हा तीन अंकांचा मापन असून, बँका आणि वित्तीय संस्था याच्या आधारे तुमच्या कर्ज परतफेड क्षमतेबाबत निर्णय घेतात.
अनेकांना प्रश्न पडतो की कमी कालावधीत हा स्कोअर सुधारता येतो का? याचे उत्तर होय आहे. योग्य शिस्त आणि रणनीती वापरल्यास तुम्ही थोड्याच काळात तुमचा स्कोअर सुधारू शकता.

सर्वप्रथम, वेळेवर बिले भरणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. क्रेडिट कार्ड बिल, कर्जाची EMI किंवा इतर कोणताही पेमेंट असेल, ते देय तारखेपूर्वी भरणे गरजेचे आहे. विलंब किंवा डिफॉल्ट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करतो.
क्रेडिट कार्ड घेणेही फायदेशीर ठरते. नवीन ग्राहक असल्यास, क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी सिक्योर्ड क्रेडिट कार्ड हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे भविष्यात लोन घेणे सोपे होते आणि कमी व्याजदरावर कर्ज मिळू शकते.
क्रेडिट युटिलायझेशन किंवा क्रेडिट वापर ३०% पेक्षा कमी ठेवणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर तुमची क्रेडिट लिमिट 1 लाख असेल, तर 30,000 पेक्षा जास्त खर्च करणे टाळा. हे तुमचा स्कोअर वाढवण्यास मदत करते.
जर तुम्ही वेळेवर पेमेंट करत असाल आणि क्रेडिट वापर कमी असेल, तर बँकेकडून क्रेडिट लिमिट वाढवण्याचा अर्ज करता येतो. वाढलेली लिमिट तुमची जबाबदारी दर्शवते, परंतु जास्त खर्च करणे टाळा.
कॅश-बेस्ड किंवा सिक्योर्ड क्रेडिट कार्डचा वापर लवकर स्कोअर सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो. यासाठी बँकेत ठराविक रक्कम जमा करावी लागते, जी क्रेडिट लिमिट म्हणून वापरली जाते. हे बँकेसाठी सुरक्षित आहे आणि नवीन यूझर सहज क्रेडिट कार्ड मिळवू शकतात.
एकाचवेळी अनेक लोन किंवा क्रेडिट कार्ड घेणे टाळा. अनेक कर्ज घेतल्यास बँक तुम्हाला जास्त जोखिम असणारा ग्राहक मानते, ज्याचा नकारात्मक परिणाम स्कोअरवर होतो.
शेवटी, तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा. भारतात CIBIL, Equifax, Experian आणि Highmark या चार मान्यताप्राप्त क्रेडिट ब्युरो आहेत. रिपोर्टमधील चुका दुरुस्त केल्यास ३० दिवसांत स्कोअर सुधारू शकतो.
तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी शिस्तबद्ध आर्थिक सवयी, नियमित पेमेंट आणि योग्य क्रेडिट कार्डचा वापर करणे अत्यंत प्रभावी ठरते. या सवयी आत्मसात केल्यास तुम्ही कमी कालावधीतही तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवू शकता, जे भविष्यातील आर्थिक गरजांसाठी फायदेशीर ठरेल.













