Cibil Score | Car Loan किंवा Home Loan घ्यायचे असल्यास किती सिबिल स्कोर असायला हवा ?

सिबिल स्कोर आपल्या कर्जाची हिस्ट्री सांगत असतो. ज्या लोकांचा हा स्कोर चांगला असतो त्यांना बँकेकडून लवकरात लवकर कर्ज मंजूर होते. मात्र ज्यांचा स्कोर कमी असतो त्यांना बँकेकडून लवकर कर्ज मंजूर होत नाही शिवाय अशा लोकांकडून अधिकचे व्याज वसूल केले जाते.

Tejas B Shelar
Published:

Cibil Score : जर तुम्ही कधी बँकेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतले असेल तर तुम्हाला सिबिल स्कोर बाबत माहिती असणारच. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो आणि कर्ज मंजूर करताना बँक हा स्कोर चेक करतात. सिबिल स्कोर आपल्या कर्जाची हिस्ट्री सांगत असतो. ज्या लोकांचा हा स्कोर चांगला असतो त्यांना बँकेकडून लवकरात लवकर कर्ज मंजूर होते.

मात्र ज्यांचा स्कोर कमी असतो त्यांना बँकेकडून लवकर कर्ज मंजूर होत नाही शिवाय अशा लोकांकडून अधिकचे व्याज वसूल केले जाते. अशा परिस्थिती, जाणकार लोक सर्वसामान्यांना सिबिल स्कोर चांगला मेंटेन करावा असा सल्ला देतात.

दरम्यान, काही लोकांचा असा प्रश्न असतो की कार कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर किती असायला हवा ? किमान किती सिबिल स्कोर असला तर बँकेकडून कर्ज मंजूर होते? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

म्हणूनच आज आपण याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. कार लोन घेण्यासाठी कमीत कमी किती सिबिल स्कोर असणे आवश्यक आहे याबाबत तज्ञांचे मत आता आपण जाणून घेणार आहोत.

कार लोन घेण्यासाठी किती सिबिल स्कोर असायला हवा?

सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत कारने प्रवास करणे खूप सोयीचे आहे. यामुळे बर्‍याच लोकांकडे खासगी कार आहेत. या मदतीने, आपण आपला आवडता मार्ग निवडून जलद गतीने आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकता.

या व्यतिरिक्त, कारच्या मदतीने आपण आपल्या कुटुंबासह कोठेही प्रवास करू शकतो. तथापि, बाजारात कारची किंमत आजकाल खूपच महाग झाली आहे. यामुळे कार खरेदी करण्यासाठी काही लोक कर्ज काढतात.

तथापि, कार लोन घेणे देखील सोपे काम नाही. यामध्ये, आपल्या पत इतिहासापासून ते सिबिल स्कोअरपर्यंतच्या गोष्टी, आपला पगार अशा साऱ्या बारीक-सारी गोष्टी तपासल्या जातात. दुसरीकडे, जर आपला सिबिल स्कोअर खराब असेल तर बँकेकडून कार लोन रद्द सुद्धा केले जाऊ शकते.

अशा परिस्थितीत बर्‍याच लोकांचा हा प्रश्न असतो की कार लोन घेण्यासाठी Cibil Score पाहिजे ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की कार लोनसाठी आवश्यक किमान सिबिल स्कोअर बँकेचे धोरण, उत्पन्न, सध्याचे कर्ज, नोकरीची स्थिरता, डाउनपेमेंट रकम इ. गोष्टी तपासल्या जातात.

या सर्व गोष्टी योग्य आढळल्यात की मग बँकेकडून कर्ज दिले जाते. पण सर्वसाधारणपणे कार लोनसाठी 700 हून अधिक स्कोअर असलेल्या ग्राहकांना प्राधान्य भेटते. पण फक्त सिबिल स्कोर हा एकच घटक कार लोनसाठी ग्राह्य धरला जात नाही. बँकेकडून इतरही गोष्टी पॅरामीटर लावून तपासले जातात.

महत्वाचे बाब म्हणजे 700 पेक्षा कमी सिबिल स्कोर असला तरी सुद्धा बँकेकडून कार लोन मंजूर होऊ शकते मात्र यासाठी संबंधित व्यक्तीला अधिकचे व्याज द्यावे लागू शकते. अशा प्रकरणांमध्ये कार लोन देताना अधिकचा व्याजदर लावला जातो. तसेच कर्जाची रक्कम देखील कमी केली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe