Cidco Lottery News : मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांना म्हाडाने नुकतीच एक मोठी गुड न्युज दिली आहे. मुंबई मंडळाने तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. आज याची जाहिरात देखील निघाली आहे. विशेष म्हणजे याचे संपूर्ण वेळापत्रक देखील आता समोर आले आहे. यानुसार म्हाडा मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली असून उद्यापासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीचं या लॉटरीची प्रत्यक्षात संगणकीय सोडत म्हणजेच लॉटरीचा निकाल देखील लागणार आहे. 14 सप्टेंबरला या लॉटरीचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे, दिवाळीच्या आधीच या लॉटरीमध्ये विजयी ठरणाऱ्या अर्जदारांना घराचा ताबा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या लॉटरीची वाट पाहिली जात होती. गेल्या वर्षी मुंबई मंडळाने 4000 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. त्यावेळी लाखभर अर्ज आले होते. यंदा मुंबई मंडळाने गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी घरांसाठी लॉटरी काढली आहे.
मात्र असे असले तरी या घरांसाठी ही लाखभर अर्ज येतील असा अंदाज आहे. यासाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाने 2000 हुन अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली असल्याने आता सिडकोची लॉटरी कधी निघणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून नवी मुंबई आणि नजीकच्या परिसरात सर्वसामान्यांना परवडेल असे घर उपलब्ध व्हावे यासाठी विविध गृह प्रकल्प विकसित केले जात आहे.
आता याच सिडको प्राधिकरणाकडून आगामी लॉटरी संदर्भात महत्त्वाची माहिती हाती आली आहे. खरे तर नवी मुंबई व आजूबाजूच्या परिसरात घर खरेदी करू इच्छिणाऱ्या अनेक इच्छुक नागरिकांच्या माध्यमातून सिडकोच्या आगामी सोडती संदर्भात विचारणा केली जात आहे.
मात्र सिडकोच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांचा पुन्हा एकदा हिरमोड होणार आहे. खरे तर सिडकोच्या काही घरांची सोडत 15 ऑगस्ट ला जाहीर होणार असे वृत्त मागे झळकले होते. मात्र आता ही शक्यता मावळत चालली आहे.
म्हणजे सिडकोच्या आगामी लॉटरीसाठी आणखी काही काळ सर्वसामान्यांना वाट पहावी लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आगामी सोडतीसाठी सिडको सध्या वाशी, जुईनगर, मानसरोवर, खारघर, खांदेश्वर अशा भागांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 25 हजार घरांची बांधणी केली जात आहे.
लहान आणि मोठ्या आकारांच्या घरांचा यामध्ये समावेश राहणार आहे. पण ही लॉटरी नेमकी कधी निघणार? याबाबत अजून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र सिडकोची आगामी लॉटरी लांबणीवर पडणार एवढे मात्र नक्की.