CNG And PNG Rate : वाढत्या महागाईने त्रस्त सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल , डिझेल , सीएनजी अन पीएनजी अशा वेगवेगळ्या इंधनांचे दर गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढले आहेत आणि आता यातील काही इंधनांचे भाव येत्या काही दिवसांनी कमी होऊ शकतात.
खरतर 2025 हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 13 – 14 दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्ष सुरू होण्याआधीच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्रातील मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने सीएनजी आणि पीएनजी च्या किमती कमी करण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
सरकारने सीएनजी (CNG) आणि घरगुती पीएनजी (PNG) गॅसच्या दरात कपात करण्याची तयारी सुरू केली असून याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयाचा देशातील वाहनचालक आणि घरगुती ग्राहकांना मोठा लाभ मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशातील पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (PNGRB) कडून गॅस वाहतुकीच्या शुल्कात मोठी कपात जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नवे रेट पुढील महिन्यापासून अर्थात एक जानेवारी 2026 पासून सक्रिय होणार आहेत.
PNGRB च्या नव्या निर्णयानुसार आता देशभरात गॅस वाहतुकीसाठी ‘युनिफाइड टॅरिफ’ प्रणाली लागू केली जाणार आहे. या नव्या प्रणालीमुळे सीएनजी आणि पीएनजी चे रेट कमी होण्याची शक्यता आहे कारण की नवीन व्यवस्था नैसर्गिक वायू वाहतुकीचा खर्च कमी करण्याची शक्यता आहे.
आता त्याचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. आता आपण सीएनजी आणि पीएनजी चे रेट नवीन वर्षात किती रुपयांनी कमी होणार याचा आढावा घेऊयात.
किती कमी होणार सीएनजी आणि पीएनजीचे रेट?
हाती आलेल्या माहितीनुसार देशात सीएनजीचे रेट किलोमागे 1.25 ते 2.50 रुपयांनी कमी होतील. त्याचवेळी घरगुती पीएनजी पाईप गॅसच्या रेटमध्ये 0.90 ते 1.80 रुपये प्रति युनिट इतकी कपात होण्याची शक्यता आहे.
सरकारने ‘एक देश, एक ग्रिड, एक टॅरिफ’ हे नवीन आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायी धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता गॅस वाहतुकीसाठी असलेली तीन झोनची रचना बदलून आता केवळ दोन झोन लागू केले आहेत.
सध्या स्थितीला जी व्यवस्था आहे त्यानुसार 300 km पेक्षा जास्त अंतरावर गॅस वाहतूक केल्यास जास्त शुल्क आकारले जात होते पण आता नव्या नियमानुसार तीनशे किलोमीटर पेक्षा अधिक अंतरासाठीचे शुल्क जवळपास 50 टक्क्यांनी कमी करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या निर्णयाचा फायदा म्हणजे राजधानी मुंबईतील महानगर गॅस, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस आणि अदानी टोटल गॅस यांसारख्या प्रमुख कंपन्यांना स्वस्त दरात घ्या उपलब्ध होऊ शकणार आहे.
साहजिकच यामुळे या कंपन्या आपल्या ग्राहकांना सुद्धा स्वस्तात सीएनजी आणि पीएनजी उपलब्ध करून देतील. या सवलतीचा थेट लाभ रिक्षा-टॅक्सी चालक, खासगी वाहनधारक तसेच घरगुती स्वयंपाकासाठी पीएनजी वापरणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.













