Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कापसाचे भाव प्रथमच हंगामातील विक्रमी पातळीवर पोहचले आहेत. आता कापूस आयातीसाठी पुन्हा एकदा शुल्क लागू करण्याचा निर्णय झाला आहे.
एक जानेवारीपासून हे शुल्क पुन्हा एकदा लागू झाली असून याच दरम्यान आता सरकीचे पण भाव वाढू लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून आता बाजारभावात मोठी वाढ होत आहे. पांढरं सोन 8,450 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचल आहे.

अमरावती एपीएमसीमध्ये सर्वाधिक भाव मिळाला आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. बुधवारी झालेल्या लिलावात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामात प्रथमच कापसाला 8,100 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
विशेष म्हणजे या बाजारात 38 टक्क्यांपर्यंत झडती असणारा कापूस थेट 8450 रुपये प्रति क्विंटल या दराने विकला गेला असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.
अर्थात आता कापूस बाजारभावाची वाटचाल 9000 च्या दिशेने झाली आहे आणि यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने सुटकेचा निश्वास घेतला आहे. अनेक दिवस कापसाचे भाव दबावत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले होते.
जवळपास दोन वर्षांपासून कापसाला अपेक्षित भाव मिळत नाहीये आणि यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पण या हंगामात कापसाला चांगला भाव मिळेल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
कापुस बाजार भावात झालेली विक्रमी दरवाढ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करणारी ठरली आहे. मागील वर्षी शासनाने कापड उद्योगाला चालना मिळावी अनुषंगाने कापूस आयातीसाठी लागू असणारे 11 टक्के शुल्क 31 डिसेंबर पर्यंत माफ केले होते.
याचाच परिणाम म्हणून देशात परदेशी कापसाची मोठ्या प्रमाणात आयात होत होती आणि यामुळे देशांतर्गत बाजार प्रचंड दबावात होता. पण आता पुन्हा एकदा कापूस आयातीसाठीचे शुल्क लागू झाले आहे आणि दुसरीकडे सरकीचे पण दर वाढले आहेत.
शिवाय बाजार भाव वाढतील या आशेने कापसाची मोठ्या प्रमाणात साठवून देखील होत आहे. त्यामुळे बाजारात कापसाचे आवक घटली असून याच सर्व घटकांचा परिणाम म्हणून आता दरात थोडी वाढ झाली आहे.
अमरावती येथे शासनाने सुरू केलेल्या सीसीआय खरेदी केंद्रावर याआधी सहा ते सात हजार क्विंटल कापसाचे आवक होत होती पण खुल्या बाजारात भाव वाढल्यानंतर ही आवक 500 ते 1000 क्विंटल वर आली आहे.
दरम्यान येत्या काळात कापसाचे भाव आणखी वाढणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळे कापसाची पुढील वाटचाल कशी राहते हे पाहण्यासारखे राहील.













