Cotton Rate : विजयादशमीपासून महाराष्ट्रातील अनेक बाजारांमध्ये कापसाची विक्रमी आवक होत असून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता कुठे दिलासा मिळतं आहे. खरे तर विधानसभा निवडणुकांच्या आधी आणि विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत कापसाचे बाजार भाव दबावात होते. अनेक ठिकाणी तर कापसाला हमीभावाएवढाही दर मिळत नव्हता.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नव्हता. पण आता राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शांत झाला असून राज्यात येत्या दोन-तीन दिवसात नवीन सरकार सत्तेवर येणार आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारली असून लवकरच महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होईल आणि त्यानंतर शपथविधीचा सोहळा संपन्न होणार आहे.
अशातच मात्र राज्यातील कापूस उत्पादकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून विधानसभा निवडणुका नंतर आता बाजारांमध्ये कापसाला विक्रमी दर मिळत असल्याचे दिसते. काल झालेल्या लिलावात राज्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल अर्थातच 25 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या लिलावात दर्यापूर येथील बाजार समितीमध्ये या हंगामात पहिल्यांदाच कापसाची खुल्या पद्धतीने लिलावाव्दारे खरेदी करण्यात आली.
खुल्या पद्धतीने लिलावाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या कापसाला काल या बाजारात ८ हजाराचा उच्चांकी भाव मिळालाय, तर सरासरी ७ हजार ४५० ते ७ हजार ५२१ रुपयेपर्यंतचा भाव मिळालाय.
मात्र असे असले तरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाला सरासरी दहा हजाराचा भाव मिळायला हवा अशी मागणी केली जात असून यासाठी सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे असे सुद्धा बोलले जात आहे.
दरम्यान, दर्यापूरच्या बाजारात कापसाचे दर थोडेसे वाढले असल्याने आगामी काळात कापसाचे भाव आणखी वाढणार का, कापसाचे भाव दहा हजाराचा टप्पा गाठणार का? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.