Cow Hug Day : केंद्र सरकारने एक निर्णय घेतला होता, यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू होती. व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश केंद्र सरकारने आज मागे घेतला आहे. यावर अनेकांनी टीका केली. यामुळे आदेश मागे घेण्यात आला आहे. या आदेशाविरोधात मीम्सचा पूर सोशल मीडियावर आला होता.
यामध्ये गाईला 14 फेब्रुवारी रोजी मिठी मारावी, असा आदेश सरकारने काढला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर टीकेचे सूर उमटू लागले होते. त्यानंतर आज सरकारकडून पत्रक काढत आदेश मागे घेत असल्याची माहिती देण्यात आली. यावर अनेक फोटो व्हायरल झाले होते.
व्हेलेंटाइन डे ऐवजी Cow Hug Day साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय हास्यास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले. यामुळे सरकारवर टीका केली जात होती.
भारतीय पशू कल्याण मंडळाने गाईला मिठी मारण्याचा आदेश पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आला. सोशल मीडियावर अनेकांनी याच्या व्हिडिओ आणि फोटो देखील तयार केले होते. यामुळे हा निर्णय मागे घेतला गेला आहे.
दरम्यान, अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी हे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी ‘Holy Cow’ होते. तर, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांतनु सेन यांनी म्हटले की, Cow Hug Day हे लोकांच्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.