Credit Report : कोणत्याही बँकेकडून अथवा वित्तीय संस्थेकडून जर कर्ज घ्यायचे असेल तर सिबिल स्कोर तपासला जातो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो आणि 750 किंवा त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोर चांगला मानला जातो.
पण, आपण फक्त सिबिल स्कोर चेक करत असतो त्यामधील बारीक-सारीक माहिती आपण कधीच चेक करत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या क्रेडिट हिस्टरी ची संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही क्रेडिट रिपोर्ट तपासला पाहिजे.

क्रेडिट रिपोर्टच्या आधारावरच व्यक्तीचा सिबिल स्कोर ठरत असतो. म्हणजेच सिबिल स्कोर पेक्षा क्रेडिट रिपोर्ट महत्त्वाचा आहे. म्हणूनच आज आपण क्रेडिट रिपोर्ट कसा तपासायचा, क्रेडिट रिपोर्ट कोण जारी करत असते? याची माहिती पाहणार आहोत.
क्रेडिट रिपोर्ट कसा तपासायचा
खरंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाने एका वर्षात एकदा क्रेडिट ब्युरो कडून फ्री क्रेडिट रिपोर्ट घेऊ शकतो असा नियम बनवलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला क्रेडिट रिपोर्ट काढायचा असेल तर तुम्ही तो फ्री मध्ये काढू शकता. भारतात चार क्रेडिट ब्युरो आहेत जे की क्रेडिट रिपोर्ट देत असतात.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे TransUnion CIBIL, CRIF High Mark, Equifax आणि Experian हे ते चार क्रेडिट ब्युरो आहेत जे की नागरिकांचे क्रेडिट रिपोर्ट तयार करत असतात. आता आपण या चारही क्रेडिट ब्युरोकडून क्रेडिट रिपोर्ट कसे मागवायचे याची माहिती पाहूयात.
Experian : https://www.experian.in/ या Experian च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला क्रेडिट रिपोर्ट मिळणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला तुमच आधार कार्ड, पॅन कार्ड, रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून क्रेडिट रिपोर्ट पाहता येणार आहे.
CRIF High Mark : https://www.crifhighmark.com/ या सीआरआयएफ हाय मार्कच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागणार आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावे लागेल. रजिस्ट्रेशन फॉर्म वरील माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल तो ओटीपी दिलेल्या रकान्यात टाकला की मग तुम्ही क्रेडिट रिपोर्ट पाहू शकता.
CIBIL : Cibil च्या https://www.cibil.com/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही तुम्ही क्रेडिट रिपोर्ट चेक करू शकता. आधार कार्ड नंबर, पॅन नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुम्हाला या वेबसाईटवरून तुमचा क्रेडिट रिपोर्ट मिळून जाईल.
Equifax : https://www.equifax.co.in/support/free-credit-report/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही क्रेडिट रिपोर्ट डाऊनलोड करू शकता.