अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे कस्टम विभागाने जप्त केली आहेत.
हार्दिक पांड्याकडे या दोन्ही घडाळ्यांची बिले नव्हती आणि ही घडाळ्ये त्याच्या सामानात असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.
पांड्याने या घडाळ्यांची किंमत १ कोटी ८० लाख असल्याचे सांगितले आहे. एका घडाळ्याची किंमत १ कोटी ४० लाख तर दुसऱ्या घडाळ्याची किंमत ४० लाख रुपये इतकी असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
पंड्याने सोशल मीडियावर आपले स्पष्टीकरण दिले आहे, त्यात त्याने लिहिले आहे की, मी भारतीय कायद्याचा सन्मान करतो. सोशल मीडियावर दुबईतून खरेदी केलेल्या घडाळ्यांची जी किंमत सांगितली जाते आहे ती चुकीची आहे.
या घडाळ्यांची किंमत ५ कोटी इतकी नाही. तर दोन्ही घडाळ्यांची एकत्र किंमत १ कोटी ८० लाख रुपये इतकीच आहे. मी नियमानुसारच ही घड्याळे खरेदी केली होती.
त्याची सारी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. नियमाप्रमाणे जोही टॅक्स द्यावा लागेल, तो चुकवून मी ती घड्याळे ताब्यात घेतली आहेत. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून जी कागदपत्रे मागितली होती, ती मी त्यांना दाखवली आहेत.
टी-२० तून बाहेर पडल्यानंतर टीम डियाचे क्रिकेटर्स भारतात परतले. रविवारी हार्दिक पांड्याही भारतात परतला. रविरात्री रात्री आलेल्या हार्दिक पांड्याला कस्टम विभागाने थांबवले होते.
त्याच्याकडीन दोन्ही घड्याळे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या दोन्ही घडाळ्यांची किंमत ५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम