DA Hike : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. मार्च महिन्यानंतर पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता बिहार राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे.
बिहार मधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 58% करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने हा निर्णय घेतलाय. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अलीकडेच तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला.

केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय झाला होता. यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% झाला असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आलीये. हा वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत वितरित करण्यात येणार आहे.
अर्थात केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता बिहार राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 58% करण्यात आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलाय.
बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी येत्या काळात आचारसंहिता लागू होणार आहे. आता ही आचारसंहिता लागू होण्याआधीच हा निर्णय अमलात आणला गेला असल्याने तेथील राज्य कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता निवडणुकीत या निर्णयाचा किती फायदा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दिवाळी व छठ पूजेच्या निमित्ताने बिहार सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना DA वाढीची खास भेट दिली आहे.
यामुळे या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडून व पेन्शन धारकांकडून स्वागत करण्यात आले आहे. बिहारच्या राज्य कर्मचाऱ्यांना 58% DA लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
येत्या काळात राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा होईल. अशा स्थितीत या महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळेल अशी आशा आहे. पण तरीही सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.