सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता वाढीची मोठी भेट, ‘इतका’ वाढला DA, वाचा…

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केव्हा वाढणार? असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात होता. अखेरकार आज केंद्रातील सरकारने महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला आहे. आज सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आहे.

Published on -

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता मध्ये 2% वाढीस मान्यता दिली आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ मिळते.

मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो आणि अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून हा भत्ता लागू होत असतो. यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली दोन टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे.

अर्थातच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता प्रकाश रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. खरे तर दरवर्षी होळीच्या आधी महागाई भत्ता वाढ लागु केली जात असते. यंदा मात्र होळीच्या आधी हा निर्णय घेतला गेला नाही.

पण आज हा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. या वाढीसह, आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांची महागाई सवलत भत्ता (डीआर) 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

गेल्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. त्यावेळी महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला. तसेच ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली.

पण यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढला आहे. महागाई भत्ता आता 55% झाला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे.

मात्र यावेळी महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढला असल्याने ही वाढ गेल्या सात वर्षांमधील सर्वात कमी वाढ असल्याचे बोलले जात आहे. आता आपण केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयानंतर पगारात किती वाढ होणार याच कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

पगारात किती वाढ होणार

50,000 बेसिक पगार असणाऱ्या लोकांना 53% महागाई भत्ता नुसार 26,500 इतका महागाई भत्ता मिळत होता. मात्र, आता 55 टक्के महागाई भत्तानुसार यामध्ये हजार रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच हा महागाई भत्ता 27 हजार 500 इतका होणार आहे.

70 हजार बेसिक पगार असणाऱ्यांना 53% महागाई भत्ता प्रमाणे 37 हजार शंभर रुपये इतका महागाई भत्ता मिळत होता मात्र आता 55% दरानुसार हा महागाई भत्ता 38 हजार 500 इतका होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe