ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 7 टक्क्यांनी वाढणार !

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ कधी मिळणार ? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित होतोय. असे असतानाच आता राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. 

Published on -

DA Hike : मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला. यानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला. यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड अशा राज्यांचा समावेश होतो.

मात्र, अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55 टक्के करण्यात आलेला नाही. पण येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 55% इतका होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

असे असतानाच महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच सुधारित होणार असून या संबंधित कर्मचाऱ्यांना तब्बल सात टक्के महागाई भत्ता वाढ लागू होईल अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा सध्याचा महागाई भत्ता किती?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता (DA) दिला जातोय. खरंतर, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सध्या 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांपेक्षा तब्बल सात टक्के कमी महागाई भत्ता मिळतोय.

यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धरतीवर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला गेला पाहिजे अशी महामंडळातील कर्मचाऱ्यांची मागणी आहे. दरम्यान आता याचा संदर्भात फडणवीस सरकार मधील मंत्र्यांकडून मोठी माहिती हाती आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार?

मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% इतका आहे मात्र यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सात टक्क्यांची वाढ होणार आहे म्हणजेच महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% इतका होईल अशी माहिती समोर येत आहे.

स्वतः फडणवीस सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाईल अशी घोषणा केली आहे. यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53% होऊ शकतो असा अंदाज मीडिया रिपोर्ट मध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सरनाईक यांनी महागाई भत्ता वाढीची घोषणा केल्यानंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. एस टी महामंडळातील कर्मचारी मोठे उत्सुक असून आता महागाई भत्ता वाढीचा निर्णय अखेर कधी होतो याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी होणार ?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल 5 मे 2025 रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीच्या संदर्भातील मागणीचा विचार केला असता याच महिन्यात म्हणजेच मे महिन्यातच त्यांना महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाईल असे आश्वासन दिलेले आहे. येत्या काही दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होईल आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News