सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट मिळणार, पगारात होणार मोठी वाढ ! महागाई भत्ता (DA) 2-3 टक्क्यांनी नाही तर ‘इतका’ वाढणार

सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या काळात एक मोठी भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि केंद्रीय पेन्शन धारकांचा महागाई सवलत भत्ता वाढवला जाणार आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा सुधारित केला जातो. मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी नोकरदार मंडळीला महागाई भत्ता वाढीची भेट मिळते.

Published on -

DA Hike : सध्या संपूर्ण भारत वर्षात होळी सणाची आतुरता आहे. भारतीय होळी सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा 14 मार्च 2025 रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार असून यामुळे सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशा या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात देशातील जवळपास 1.2 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि 50 लाख पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या काळात एक मोठी भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि केंद्रीय पेन्शन धारकांचा महागाई सवलत भत्ता वाढवला जाणार आहे. यामुळे सरकारी कर्मचारी अन पेन्शन धारकांच्या अनुक्रमे वेतनात अन पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे.

किती वाढणार महागाई भत्ता?

महागाई भत्ता एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा सुधारित केला जातो. मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी नोकरदार मंडळीला महागाई भत्ता वाढीची भेट मिळते.

मार्च महिन्यात सुधारित होणारा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू केला जातो आणि ऑक्टोबर महिन्यात सुधारित होणारा महागाई भत्ता हा जुलै महिन्यापासून लागू केला जात असतो.

यानुसार या चालू मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. पण ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधी मधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे.

दरम्यान जुलै 2024 मधील एआयसीपीआयची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे आणि यामध्ये महागाई भत्ता पुन्हा एकदा चार टक्क्यांनी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असल्याने लवकरच हा भत्ता 57% वर पोहोचणार आहे.

विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार असल्याने आणि याचा प्रत्यक्षात लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा सरकारी नोकरदार मंडळीच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार DA वाढीचा निर्णय मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो. मात्र महागाई भत्ता कितीने वाढणार आणि याचा निर्णय कधीपर्यंत होणार? याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

त्यामुळे आता प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकार महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधीपर्यंत घेते, या प्रस्तावाला कधीपर्यंत हिरवा झेंडा दाखवला जातो हे विशेष पाण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News