अखेर फायनल निर्णय झालाच ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार, ‘या’ तारखेला फाईलवर स्वाक्षरी होणार

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आता आणखी तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कितीने वाढणार आणि याबाबतचा निर्णय कधी होऊ शकतो याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

DA Hike : सातवा वेतन आयोग लागू असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या महागाई भत्ता वाढीबाबत. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होत असतो.

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे. ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू आहे आणि आता जानेवारी 2025 पासून नवीन महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची जानेवारी 2025 पासून ची महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जाणार आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात घेतला जातो.

मार्च महिन्यात साधारणतः होळीच्या दरम्यान याबाबतचा निर्णय होतो आणि यंदाही होळीच्या दरम्यान महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता आपण यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महागाई भत्ता कितीने वाढणार

सध्या सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे. गेल्यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता यामुळे आता यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबत जाणून घेण्याची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी उत्सुकता आहे.

महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते. महागाई भत्ता वाढीची एआयसीपीआयची आत्तापर्यंतची आकडेवारी पाहिली असता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा यावेळी देखील तीन टक्क्यांनीच वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कर्मचारी संघटनांच्या मते यावेळी महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. पण नेमका महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार की चार टक्क्यांनी याबाबतचे अधिकृत माहिती पुढल्या महिन्यातच समोर येणार आहे. महागाई भत्ता 56% होणार की 57% याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांनी होण्याची शक्यता आहे.

पगार कितीने वाढणार?

महागाई भत्ता नेमका किती वाढणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही पण जर महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे गृहीत धरले तर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढेल याचे कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेऊयात. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18000 रुपये आहे त्यांना सध्याच्या 53% दरानुसार 9540 महागाई भत्ता मिळतोय.

मात्र जेव्हा महागाई भत्त्यात आणखी तीन टक्क्यांची वाढ होईल तेव्हा 18 हजार रुपये मूळ पगार असणाऱ्या लोकांना 56% दरानुसार दहा हजार 80 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता 540 रुपयांनी वाढणार आहे.

अधिकृत निर्णय कधी होणार

महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय पुढल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये घेतला जाणार आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी 2025 पासून होणार आहे. अर्थातच महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना साहजिकच महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News