आज वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता! किती वाढेल DA ? पगारात किती वाढ होणार ?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज 26 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार असून याबाबतचा शासन निर्णय आज जारी होण्याची शक्यता आहे.

Published on -

DA Hike : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता वाढीची वाट पाहिली जात आहे. दरवर्षी होळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो मात्र यावेळी असे काही घडले नाही.

त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये फारच पॅनिक सिच्युएशन पाहायला मिळत असून DA वाढीचा लाभ नेमका कधी मिळणार हा सवाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव पूर्णतः तयार असून यावर फक्त निर्णय घेणे बाकी आहे.

दरम्यान आज 26 मार्च 2025 रोजी या प्रस्तावावर केंद्रातील सरकारकडून अंतिम निर्णय होईल असे म्हटले जात आहे. आज होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर याबाबत शासन निर्णय जारी होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.

नक्कीच आज याबाबतचा निर्णय झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या पगारात देखील चांगली वाढ होईल. आता आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कितीने वाढणार आणि यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढेल याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार?

सातवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाते. मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो. मात्र याचा लाभ अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून लागू केला जातो.

दरम्यान आज जर महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय झाला तर ही वाढ जानेवारी 2025 या महिन्यापासून लागू होणार आहे. खरे तर गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण सात टक्के महागाई भत्ता वाढ मिळाली होती.

गेल्या वेळी मार्च महिन्यात चार टक्क्यांनी आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. मात्र या चालू महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय.

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आता आणखी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे म्हणजेच हा भत्ता 55% होईल असे बोलले जात आहे.

मात्र असे झाल्यास ही महागाई भत्ता वाढ गेल्या सात वर्षांमधील सर्वात कमी वाढ राहणार आहे आणि म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय.

पगार किती वाढणार ?

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18000 रुपये आहे त्यांना सध्याच्या 53% दराने 9540 रुपयांचा महागाई भत्ता मिळतोय. मात्र हा महागाई भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर किमान 18 हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9 हजार 900 इतका महागाई भत्ता मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe