महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढल्यानंतर शिपाई, लिपिक, सेक्शन ऑफिसर कोणाचा पगार किती वाढणार?

Published on -

DA Hike : सातव्या वेतन आयोगातील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% करण्यात आला आहे.

ही वाढ जुलै 2025 पासून लागू असून यामुळे एक कोटी कार्यरत सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

खरे तर आधी मार्चमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली होती.

आता सरकारने महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान महागाई भत्ता तीन टक्क्यांची वाढ झाली असली तरी देखील शिपाई लिपिक सेक्शन ऑफिसर अशा पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढणार हा प्रश्न उपस्थित होतोय.

किती वाढणार पगार? 

शिपाई पदावर कार्यरत (अठरा हजार बेसिक पगार) असणाऱ्याला 55% प्रमाणे 9900 महागाई भत्ता मिळत होता. आता 58% दराने दहा हजार 440 रुपये मिळतील.

लिपिक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना (बेसिक पगार 19,900) 55% दराने दहा हजार 945 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता तो भत्ता 11542 रुपयांवर पोहोचला आहे.

अप्पर डिव्हिजन क्लर्क पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने 14 हजार 25 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता हा महागाई भत्ता 14,790 रुपयांवर पोहोचला आहे.

सेक्शन लॉ ऑफिसर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने 30,855 महागाई भत्ता मिळत होता आता हा भत्ता 32,538 रुपयांवर पोहोचला आहे.

डायरेक्टर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना 55% नुसार 67,650 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता 58% प्रमाणे 71 हजार 340 रुपये मिळतील.

जॉईंट सेक्रेटरीला 55 टक्के दराने 79,310 महागाई भत्ता मिळत होता. आता या कर्मचाऱ्यांना 83,636 महागाई भत्ता मिळणार आहे.

सेक्रेटरीला 55 टक्के नुसार 1,23,750 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता तो भत्ता 1,30,500 रुपयांवर पोहोचला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe