DA Hike News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रातील सरकारकडून 55% वरून 58% करण्यात आला असून या निर्णयाचा एक जुलै 2025 पासून प्रत्यक्षात लाभ दिला जातोय. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा ही महागाई भत्ता वाढवला जात आहे.

याशिवाय विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता सरकारकडून वाढवला जातोय. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 58% करण्यात आला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून 20 ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ देखील एक जुलै 2025 पासून लागू आहे.
अर्थात या संबंधित अधिकाऱ्यांना देखील महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार आहे. दिवाळीत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 58% करण्यात आला असल्याने या निर्णयाचा संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.
राज्यातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार महागाई भत्ता वाढ
दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार अशी आशा होती.
परंतु आजही राज्य कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकाचा महागाई भत्ता 55% इतकाच आहे. पण दिवाळीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा देखील महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येईल म्हणजेच त्यांचा महागाई भत्ता 58% होईल आणि ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एक जुलैपासून लागू करण्यात येईल. परंतु याचा अधिकृत शासन निर्णय हा नोव्हेंबर महिन्यात निघण्याची शक्यता असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे.