DA Hike News : 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मोठी मागणी मान्य केली. आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली असली तरी देखील आयोगाच्या अध्यक्षाची आणि समितीच्या सदस्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
पण, येत्या काही दिवसांनी लवकरच नव्या आयोगाची अध्यक्षाची आणि सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यानंतर आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारकडे सादर होणार आहेत. मात्र, याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. हा महागाई भत्ता जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
जुलै 2024 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता त्याआधी कर्मचाऱ्यांना फक्त 50 टक्के इतका महागाई भत्ता मिळत होता. दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहील.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात येणाऱ्या महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार आहे, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहील. पण यावेळी महागाई भत्ता तीन किंवा चार टक्क्यांनी वाढणार नाही.
महागाई भत्ता एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो आणि जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यावेळी महागाई फक्त फक्त दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास गेल्या सात वर्षांमधील ही सर्वात कमी वाढ राहणार आहे. महागाई भत्ता दोन टक्क्यांची वाढ झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका होणार असून या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मार्च महिन्याच्या पगारांसोबत मिळणार आहे.
परंतु ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
खरेतर जुलै 2018 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना फारच कमी महागाई भत्ता वाढ मिळाली होती. पण आता त्यानंतर म्हणजेच सुमारे 78 महिन्यानंतर महागाई भत्त्यामध्ये सर्वात कमी वाढ होणार आहे.
जुलै ते डिसेंबर 2018 या कालावधीत महागाई भत्तामध्ये सर्वात कमी वाढ झाली होती त्यावेळी DA फक्त 2% वाढला होता. म्हणून आता सात वर्षानंतर पहिल्यांदाच सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात कमी महागाई भत्ता वाढ लागू होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.