सरकारी कर्मचाऱ्यांवर दिवाळी आधी माता लक्ष्मीची कृपा ! या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तब्बल 8 टक्क्यांनी वाढला

Published on -

DA Hike News : दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांवर माता लक्ष्मीची कृपा झाली आहे. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतीच एक मोठी भेट दिली आहे. पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. खरे तर अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% झाला असून ही वाढ जुलै 2025 पासून लागू आहे. खरे तर याकडे सातव्या वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ म्हणूनही पाहिले जात आहे. दरम्यान आता केंद्रीय सेवेत कार्यरत असणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

केंद्रातील सरकारने पाचवा तसेच सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.

दिवाळीच्या आधीच हा निर्णय झाला असल्याने संबंधितांच्या पगारात मोठी वाढ होणार असून सणासुदीच्या दिवसांमध्ये त्यांची आर्थिक अडचण दूर होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या नव्या महागाई भत्ता वाढीबाबत माहिती दिली.

आता आपण पाचवा वेतन आयोगातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकांचा महागाई भत्ता कितीने वाढला आणि सहावा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता कितीने वाढला याचा आढावा घेऊयात.

पाचवा वेतन आयोग  – आतापर्यंत केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या पाचव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना 466% दराने महागाई भत्ता मिळत होता. पण आता हा महागाई भत्ता 474% इतका करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ही वाढ एक जुलै 2025 पासून प्रभावी राहणार आहे.  याचा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत मिळेल अर्थात कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचाही लाभ मिळणार आहे. अर्थात या लोकांचा महागाई भत्ता 8 टक्क्यांनी वाढलाय.

सहावा वेतन आयोग  – या आयोग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा DA 5 टक्क्यांनी वाढवण्यात आलाय. याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे. पण ही वाढ एक जुलैपासून लागू होईल. अर्थात याच्या फरकाची रक्कम मिळेल. आतापर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 252 टक्के होता. आता हा महागाई भत्ता 257% झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News