राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 03% महागाई भत्ता वाढी बाबतचा प्रस्ताव रेडी, ‘या’ तारखेला होणार निर्णय

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहे. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून पुन्हा एकदा आणखी तीन टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे.

DA Hike News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोग स्थापित करण्याची मोठी घोषणा केली होती. त्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहे. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून पुन्हा एकदा आणखी तीन टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे.

याबाबतचा निर्णय हा होळीच्या आधी होऊ शकतो म्हणजेच मार्च महिन्यात हा निर्णय होईल असे म्हटले जात आहे. पण राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही 50% एवढाच आहे.

यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या धरतीवर लवकरात लवकर 53% झाला पाहिजे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 03 टक्के डी.ए वाढ बाबत शासन निर्णय कधी निर्गमित होणार ? याकडे राज्यातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने दि. 01 जुलै 2024 पासुन 03 डीए वाढ केली असून, सदर महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागु करणे प्रलंबित आहे.

राज्यात गेल्या वर्षी विधानसभा निवडणूका होत्या अन याच्या कामकाजामुळे तसेच आचारसंहितेमुळे सदर निर्णय घेण्यात आला नाही. पण आता राज्यात नवीन सरकार स्थापित झाले आहे आणि राज्याचे नविन मंत्रीमंडळ सुद्धा स्थापित झाले असून मंत्रिमंडळ स्थापनाला जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे.

मात्र अजूनही डीएवाडी बाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. अशातच आता मीडिया रिपोर्ट्स मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा डीएवाढी बाबतचा निर्णय जानेवारी अखेरपर्यंत घेतला जाईल असे म्हटले जात आहे.

वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव रेडी केला असून हा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे. यामुळे जानेवारीअखेरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएवाढी बाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हा निर्णय झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% एवढा होणार असून ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe