DA Hike News : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी च्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि तेव्हापासून नवा वेतन आयोग चर्चेत आला आहे. दरम्यान सरकारने देखील नवा वेतन आयोगाबाबत लोकसभेत नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
केंद्रीय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रातील सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट देताना नवीन आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत सातवा वेतन आयोगातून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अशातच आता महागाई भत्ता वाढी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2026 सुरू झाल्याबरोबर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार यासंदर्भात मीडिया रिपोर्ट मधून मोठी माहिती समोर आली आहे.
किती वाढणार महागाई भत्ता ?
सातव्या वेतन आयोगातून शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतोय. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.
जानेवारी महिन्यापासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय साधारणतः मार्च महिन्यात होळीच्या आसपास घेतला जातो. तसेच जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा विजयादशमीच्या आसपास घेतला जातो.
दरम्यान, आता पुढल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे.
याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात होणार असला तरीसुद्धा ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे आणि एआयसीपीआयच्या जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमधील आकडेवारीनुसार ही वाढ ठरवली जाणार आहे.
दरम्यान सध्या स्थितीला जी आकडेवारी समोर येत आहे यानुसार जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. यामध्ये पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून आणखी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे.
म्हणजेच या वाढीनंतर महागाई भत्ता 60% पोहोचणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून प्रभावी राहणार आहे. परंतु याचा निर्णय मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचाही लाभ दिला जाईल.













