सरकारी कर्मचाऱ्यांचा DA किती वाढणार ? अखेर ठरलं ! महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव रेडी, ‘या’ तारखेला शासन निर्णय (GR) निघणार

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो. आता चालू मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी वाढवला जाणार आहे.

Published on -

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होळीच्या आधीच एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय. मात्र लवकरच हा भत्ता आणखी वाढणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो.

गेल्या वर्षी, ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. त्यावेळी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% एवढा केला आणि ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली.

आता चालू मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी वाढवला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार ? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

महागाई भत्ता कितीने वाढणार?

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय. दरम्यान आता यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. खरेतर, एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरवला जात असतो.

आता जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवला जाणार आहे. केंद्र सरकारने दरवर्षी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाईच्या भत्तेच्या दरात आणि महागाई सवलतीच्या दरात सुधारणा केली आहे.

ही वाढ दरवर्षी जानेवारी/जुलैपासून केली जाते, जी मार्च आणि ऑक्टोबरच्या सुमारास जाहीर केली जाते. जर आपण जुलै ते डिसेंबर या कालावधीत आकडेवारी पाहिली तर एआयसीपीआय निर्देशांक गुण 143.7 वर पोहोचले आहेत आणि डीए स्कोअर 55 % पर्यंत पोहोचला आहे, म्हणून डीए 2 ते 3 % वाढेल असे चित्र सध्या दिसत आहे.

म्हणजेच डीए 55 किंवा 56 टक्के पर्यंत पोहोचू शकतो. याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात होणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू असेल. अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची थकबाकी सुद्धा मिळणार आहे.

कधी निघणार शासन निर्णय?

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर पाच मार्च 2025 रोजी किंवा 12 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. दरम्यान याचं बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

अर्थात पाच तारखेला किंवा मग 12 तारखेला याबाबतचा निर्णय होईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार सोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे.

परंतु या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय नेमका कधी निघणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe