DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे, जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला होता.
मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला. यानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका झाला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू झाली.

खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होत असतो. 2025 बाबत बोलायचं झालं तर यावर्षी जानेवारी पासूनचा महागाई भत्ता सुधारित झालेला आहे.
दरम्यान आता पुढील जुलैपासून महागाई भत्ता किती वाढणार याबद्दल केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर महागाई भत्ता हा एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो आणि आता याच आकडेवारीच्या बाबत एक नवीन माहिती हाती आली आहे.
काय सांगते आकडेवारी ?
सरकारी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यापासून चा महागाई भत्ता एआयसीपीआयच्या जानेवारी ते जून 2025 या कालावधी मधील आकडेवारीनुसार ठरणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्या 55% इतका आहे आणि सध्याची आकडेवारी पाहिली असता यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे.
म्हणजेच हा भत्ता 58 टक्क्यांवर पोहोचू शकतो. मात्र आतापर्यंत एआयसीपीआयची फक्त जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचीच आकडेवारी समोर आलेली आहे अजून एप्रिल ते जून या कालावधीमधील आकडेवारी येणे बाकी आहे.
ही आकडेवारी समोर आल्यानंतरच खऱ्या अर्थाने किती महागाई भत्ता वाढणारे ठरणार आहे. परंतु सध्याच्या आकडेवारीचा ट्रेंड पाहिला असता पुढील वेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवू शकतो.
ही महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे आणि या संदर्भातील निर्णय दिवाळीच्या आसपास होईल असे म्हटले जात आहे. जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता हा दिवाळीच्या आसपास सुधारित होतो आणि यंदाही दिवाळीच्या आसपासच हा महागाई भत्ता वाढेल असे बोलले जात आहे.
पगारात किती वाढ होणार?
दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढल्यास त्यांना दहा हजार 440 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18000 रुपये आहे त्यांना 58% महागाई भत्ता लागू झाल्यास दहा हजार चारशे चाळीस रुपये महागाई भत्ता मिळणार आहे.
सध्याच्या 55% दरानुसार 18,000 मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त 9,900 रुपये एवढा महागाई भत्ता मिळतोय. म्हणजेच 18000 बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% रेट लागू झाल्यानंतर प्रतिमहा 540 रुपयांनी वाढणार आहे.