DA Hike : आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. खरंतर 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासूनच या नव्या वेतन आयोगाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अशातच आता या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर मध्ये काय बदल होणार आणि महागाई भत्ताचे सूत्र कसं असणार? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

सातव्या वेतन आयोगाला दहा वर्ष
सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 रोजी लागू झाला. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो. यानुसार 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग समाप्त होणार आहे आणि त्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.
फिटमेंट फॅक्टर काय असणार?
सध्याच्या सातव्या वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. या फिटमेंट फॅक्टर मुळे सातव्या वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 14.27% वाढला. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत किमान मूळ पगार अठरा हजार रुपये इतका करण्यात आला.
दरम्यान आता नव्या आठव्या वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा जवळपास 24 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असा एखांदा समोर येत आहे. आठवा वेतन आयोग अंतर्गत 18 ते 24 टक्के इतकी वेतन वाढ लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सातव्या वेतन आयोगात ट्रीटमेंट फॅक्टर 2.57 एवढे होते. मात्र आता नव्या आठव्या वेतन आयोगात ट्रीटमेंट फॅक्टर 1.90, 2.08 किंवा 2.86 इतके असू शकते. मात्र सर्वात जास्त चर्चा 1.90 फिटमेंट फॅक्टर ची आहे. सरकारी यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1.90 फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते.
यामुळे नव्या आठव्या वेतन आयोगात पगारात मोठी बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. जर समजा फिटमेंट फॅक्टर 1.90 इतका निश्चित करण्यात आला तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18000 वरून 34 हजार दोनशे रुपयांपर्यंत जाणार आहे.
महागाई भत्ताबाबत काय निर्णय होणार?
नव्या आठव्या वेतन आयोगात फक्त बेसिक पगारच नाही तर महागाई भत्ता (DA), ट्रांसपोर्ट अलाउंस (TA) आणि हाउस रेंट अलाउंस (HRA) मध्ये पण जोरदार वाढ होणार असे बोलले जात आहे.
आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य केला जाईल आणि महागाई भत्त्याची रक्कम ही बेसिक पगारात मर्ज होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता शून्य गेल्यानंतर प्रत्येक सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढ लागू होईल.